वारे हिंमत आरटीओ असल्याचे सांगत खाकी घालून तोतया गेला बीडच्या कार्यालयात
बीडच्या आरटीओ अधिकाऱ्यांनी ओळखून दिले ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात

लोकगर्जनान्यूज
बीड : पोलीस कर्मचाऱ्याचे काम करुन देण्यासाठी एक तोतया अंगावर खाकी घालून अंबाजोगाई आरटीओ कार्यालयात इन्स्पेक्टर असल्याचे सांगत तो चक्क बीड येथील आरटीओ कार्यालयात पोचला पण तेथील अधिकाऱ्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. चौकशी करताच त्या तोतय आरटीओ इन्स्पेक्टरचा भांडाफोड झाला. त्यास पकडून बीड ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले. तोतया आरटीओ इन्स्पेक्टर पकडल्याची चर्चा सुरू होताच खळबळ उडाली असून, वारे हिंमत असे उद्गार काढले जाते आहे.
सोमवारी ( दि. ४ ) सकाळी एकजण खाकी वर्दी घालून बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पोचला, मी अंबाजोगाई येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ( आरटी ) कार्यरत असल्याचे सांगु लागला. काहीवेळ तेथील ही आरटीओ अधिकाऱ्यांच्या लक्षात हे आले नाही. परंतु तो तेथे फिरताना त्याचे हावभाव पाहून अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी चौकशी सुरू केली असता यातून त्याचा भांडाफोड झाला. हा तोतया आरटीओ इन्स्पेक्टर असल्याचे लक्षात येताच पकडून त्यास बीड ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले. राहूल नाईकवाडे असे या तोतया आरटीओ इन्स्पेक्टरचे नाव आहे . याप्रकरणी गणेश जयराम विघ्ने ( वय ३७ वर्ष ) मोटार परिवहन अधिकारी,बीड यांच्या फिर्यादीवरून तोतया राहुल नाईकवाडे याच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरटीओ कार्यालयातच तोतया आरटीओ इन्स्पेक्टर पकडल्याची बातमी बाहेर पसरली अन् अनेकांनी तोंडांत बोट धरून वारे हिंमत अशी प्रतिक्रिया दिली.
विशेष तो पोलीसाचे काम घेऊन आला!
पकडलेला तोतया आरटीओ कार्यालयात खाकी घालून तर आलाच परंतु एका पोलीस कर्मचाऱ्या सोबत त्यांचे काम घेऊन आला होता.