आपला जिल्हा

Electric bike- विजेवर चालणारी दुचाकी घेण्याचा विचार करताय; बीडची घटना वाचा

उभ्या दुचाकीला लागली अचानक आग

लोकगर्जनान्यूज

बीड : विजेवर चालणारी ( Electric bike ) दुचाकी घेण्याकडे सध्या बऱ्याच लोकांचा कल आहे. परंतु ही दुचाकी सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याला कारणही तसेच असून या दुचाकींना आग लागत असल्याच्या अनेक बातम्या वाचण्यात पहाण्यात आल्या आहेत. आज शनिवारी दुपारी रस्त्यावर उभी असलेली ( Electric bike ) विजेवर चालणारी दुचाकी पेटल्याची घटना घडली. दुचाकीला आग लागलेली लक्षात येताच अनेकांनी धाव घेत आग विझवली.

पेट्रोलचे दर गगनाला भिडले असल्याने दुचाकी वापरने सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले. यामुळे अनेकांनी दुचाकी कडे पाठ फिरवायला सुरुवात केली. हा प्रकार दुचाकी निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या लक्षात येताच त्यांनी चार्जिंगवर चालणारी ( Electric bike ) व चार चाकी गाड्यांची निर्मिती सुरू केली. याचं मोठं मार्केटिंग करुन लोकांचे लक्ष या विजेवर चालणाऱ्या ( Electric bike ) वाहनांके आकर्षित केले. एकदा चार्ज करा अन् इतके किलोमीटर चला अशा जाहिराती करुन दुचाकी घेणाऱ्यांना ( Electric bike ) ची भुरळ घातली. परंतु या वाहनांना अचानक आग लागत असल्याच्या वर्तमानपत्रात बातम्या वाचण्यात आल्या तसेच टिव्ही वरही प्रसारीत झालेल्या आहेत. याचा प्रत्यय आज शनिवारी ( दि. २४ ) बीडच्या जनतेला आला. येथील बशीर गंज भागातील इडन कॉम्प्युटर समोर एक विजेवर चालणारी ( Electric bike ) एम.एच. २३ बी डी ८४७० या क्रमांकाची दुचाकी उभी होती. या दुचाकीने अचानक पेट घेतला. धूर निघत असलेला पाहून घटनास्थळी उपस्थितांनी धाव घेत पाणी टाकून आग विझवली. रस्त्यावर उभी असल्याने आग लागली म्हणून जमलं अन्यथा चालू असताना आग लागली असती तर अनुचित प्रकार घडला असता. सदरील दुचाकी शहरातील फेरोज पठाण यांची असल्याची सांगितले जात आहे. अचानक लागलेली ही आग पहाता Electric bike घ्याची का? तर ही घटना पहा असे म्हणत आहेत. ही आग का लागली, कशी लागली याबाबत अधिक माहिती समोर आली नाही. कंपनी आता याबाबत काय? स्पष्टीकरण देणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »