शिक्षण संस्कृती
जि.प. उर्दू प्रा.शाळा, मदळमोही येथे शाळा पूर्व तयारी अभियान उत्साहात

मदळमोही : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा घेण्यात आला. यामध्ये इयत्ता पहिलीत दाखल पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत व घोड्यावरुन फेरी काढून मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.
कोरोना काळात जी मुले पूर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहिले होते, त्यांच्याकरता शासनाने ‘शाळा पूर्व तयारी’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत आज मंगळवारी मदळमोही येथील जि.प. शाळेत शाळा पूर्व तयारी उपक्रम घेण्यात आला. या मेळाव्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२२ मधील पहिली मधील सर्व दाखल पात्र विद्यार्थ्यांना फुल व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले तसेच प्रवेशपात्र मुलांना घोड्यावर बसून गावात प्रवेशोत्सव फेरी थाटात काढण्यात आली.