क्राईम

ट्रकची धडक दुचाकीस्वार शेतकरी ठार

लोकगर्जना न्यूज

अंबाजोगाई : तालुक्यातील पूस येथे ट्रक व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार शेतकरी ठार झाल्याची घटना अंबाजोगाई-अहमदपूर महामार्गावर पूस येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी ( दि. ८ ) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने पूस येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मधुकर ज्ञानोबा हाके ( वय ५५ वर्ष ) रा. पूस हे शनिवारी जवळगाव रस्त्यावर असलेल्या शेतातून दुचाकीवर घरी परतताना अंबाजोगाई-अहमदपूर महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले. यावेळी अंबाजोगाई कडून अहमदपूरच्या दिशेने चाललेल्या ट्रकने हाके यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत हाके दुचाकीवरून खाली पडलं गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथे सरकारी दवाखान्यात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासणी करुन मधुकर हाके यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अपघात घडताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. यावेळी चालकाला चांगला चोप देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »