जरांगे पाटलांनी घेतली बीडच्या एसपींची भेट अन् मराठा तरुणांना केले म्हत्वाचे आवाहन
लोकगर्जनान्यूज
बीड : येथे आज बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. तसेच बीडचे एसपींची भेट घेतली असून जाळपोळीच्या घटनेशी संबंध नसलेल्या तरुणांना त्रास न देण्याची मागणी केली. तसेच शंभर टक्के आरक्षण मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत कोणीही आत्महत्या करु नये तसेच आंदोलन शांततेत करण्याचे म्हत्वाचे आवाहन केले.
बीड येथे मराठा आरक्षण आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले व यानंतर माजलगाव,बीड येथे जाळपोळीच्या घटना घडल्या. या घटनेनंतर प्रथमच मनोज जरांगे पाटील यांनी बीड आले. यावेळी येताना ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी त्यांनी बीडचे एसपी ठाकुर यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. भेट घेऊन परत जाताना पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जाळपोळीच्या घटनेत जे सहभागी होते त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी परंतु काही संबंध नसतानाही काही मराठा तरुणांना त्रास देण्यात येत आहे. अशा गुन्हा नसलेल्या तरुणांना त्रास होऊ नये. मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे त्यामुळे कोणीही आत्महत्या करु नका. साखळी उपोषण हे शांततेत आंदोलन करा. शांततेत मोठी ताकद असल्याचे मराठा तरुणांना आवाहन केले.