आपला जिल्हा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणी प्रमाणे सर्वांना सोबत घेऊन प्रगती साधायची – रमेश आडसकर

राजमुद्रा असलेला राज्यातील पहिल्या चौकाचा आडस येथे थाटात लोकार्पण सोहळा पार पडला

लोकगर्जनान्यूज

केज : रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. या शिकवणी प्रमाणे आपल्याला ही सर्वांना सोबत घेऊन प्रगती साधायची असून, पुर्ण गावाची एकी झाल्याने भव्य दिव्य असा गावाच्या वैभवात भर घालणारा चौक झाल्याचे प्रतिपादन भाजपा नेते रमेश आडसकर यांनी राजमुद्रा असलेला आडस येथील राज्यातील पहिल्या चौकाचा लोकार्पण सोहळा व शिवजयंती निमित्त शिव प्रतिमा पूजन सोहळ्यात बोलताना केले.

आडस ( ता. केज ) येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या मांगल्याची नियमित आठवण व्हावी या उद्देशाने राजमुद्रा असलेला चौक गावकऱ्यांच्या सहकार्याने बांधण्यात आला. याचा लोकार्पण व शिवजयंती सोहळा रविवारी ( दि. १९ ) सकाळी १० वाजता हजारोंच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना रमेश आडसकर म्हणाले की, चौकाच्या बांधकामाला थोडा वेळ लागला परंतु तरुण व ग्रामस्थांनी एकत्र येत हे काम हाती घेतले अन् सर्वांच्या एकीच्या बळावर हा भव्य दिव्य तसेच एक देखणा चौक उभा राहिला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श समोर ठेवून स्व.बाबुरावजी आडसकर साहेबांनी राज्यात गावाला ओळख निर्माण करुन दिली. तोच आदर्श आम्ही समोर ठेवून चालत आहोत. यातूनच राज्यात पहिला राजमुद्रा असणार चौक उभा केला आहे. जसं यासाठी सर्व एकत्र आले ही एकी कायम ठेऊन आपल्याला प्रगती साधायची आहे. व्यसनाधीनता वाढत असून, आज शिवजयंतीच्या निमित्ताने तरुणांनी व्यसनापासून दूर रहाण्याचा निश्चय करावा असे आवाहन करत मी गाडीत जिल्हाभर एकटा फिरतो कारण माझ्या मागे आडसची शक्ती असल्याचेही रमेश आडसकर यांनी सांगितले. यावेळी युवक नेते ऋषिकेश आडसकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना गावाच्या भल्यासाठी मी सदैव तुमच्या सोबत असल्याचा तरुणांना आधार दिला. यावेळी सरपंच बालासाहेब ढोले, चेअरमन उद्धवराव इंगोले, बब्रुवान ढोले, कमलाकर कोपले, शेख गयास भाई, बाळासाहेब देशमुख, बालासाहेब ढोले, प्रशांत चव्हाण, विठ्ठल माने, नितीन ठाकूर, गजानन देशमुख , शशी आडसकर,हनुमंत कोकाटे, वचिष्ठ लाखे, रामधन लाखे ( सरपंच खोडस ) आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिवरुद्र आकुसकर यांनी केले तर प्रस्ताविक अनंत शेळके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समिती व शिवप्रेमी तरुणांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
शिवजयंती उत्सव समितीकडून पूस्तक भेट
यावेळी गावातील अनेकांचा शिवजयंती उत्सव समितीकडून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रत्येकाला कॉ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? हे पुस्तक भेट दिले. सत्कारासाठी पुस्तक हे एक आदर्श पायंडा आडसकरांनी पाडला आहे. याचेही कौतुक करण्यात येत आहे.
शिख बंधुची स्व इच्छेने देणगी
आडस येथे गहू, हरभरा काढण्यासाठी पंजाब राज्यातील हार्वेस्टर आलेलं आहे. याचे मालक बिट्टू सिंग यांनी चौकासाठी स्व इच्छेने ५ हजार रुपये देणगी दिली. यामुळे त्यांचाही सत्कार शिवजयंती उत्सव समितीने केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »