तोतरं,बोबड बोलणारी मुलेही आता स्पष्ट बोलू लागणार; सरकारी दवाखान्यात दाखवून मोफत शस्त्रक्रिया करून घ्या

लोकगर्जनान्यूज
बीड : ‘जागरुक पालक सदृढ बालक’ मोहिम सुरू आहे. या अंतर्गत बालकांची 0 ते 18 वयाच्या तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत आढळून आलेली बीड जिल्ह्यातील ३१ बोबडे बोलणारी काही अक्षरांचा उच्चार करता न येणाऱ्या मुलांवर ‘टंग टाय’ शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे ही ३१ बालकं आता स्पष्ट बोलू लागणार आहेत. अशी काही बालकं असतील तर पालकांनी सरकारी दवाखान्यात तपासणी करुन मोफत शस्त्रक्रिया करून घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
बरीच मुले बोबडं, तोतरं बोलण्याच वय होऊन गेल्यानंतरही काही शब्दांचे उच्चार करु शकत नाहीत. ते बोबडं बोलतं असल्याने चेष्टा केली जाते. अशा बालकांचा ‘जागरुक पालक सदृढ बालक’ या मोहिमेअंतर्गत तपासणी दरम्यान बीड जिल्ह्यात ३१ बालकं बोबडं बोलणारी आढळून आली. या सर्व बालकांवर पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयात ‘टंग टाय’ शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे ही सर्व बालकं आता इतर मुलांप्रमाणे स्पष्ट व सर्व शब्दांचा उच्चार करु शकणार आहेत. यामुळे पालकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. बालकं स्पष्ट बोलू शकणार असल्याने त्यांच चेष्टा, मस्करी थांबणार आहे.
बोबडं, तोतर का बोलतात
लहान मुलं बोबडं बोलतात परंतु त्या वयाच्या पुढे जाऊन ही काही मुलांना र,ळ,द्र अशा काही शब्दांचे उच्चार करता येत नाही. ते बोबडं बोलतात अशा बालकांच्या जीभेला शेंडा कमी असतो, जीभ चिकटलेले असते यावर ‘टंग टाय’ शस्त्रक्रिया केल्यास स्पष्ट बोलता येत.
शस्त्रक्रिया मोफत
बोबडं, तोतरं बोलण्याच वय होऊन गेल्यानंतरही बालक असं बोलत असतील तर सरकारी दवाखान्यात तपासणी करुन घ्यावी. या बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. खाजगी दवाखान्यात याच शस्त्रक्रियेसाठी जवळपास 10 हजार पर्यंत खर्च येतो.