गुरुवारी कलशारोहण सोहळा; आडस येथे दोन दिवस भक्तीसोहळा
लोकगर्जनान्यूज
आडस : येथील आडकेश्वर महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा व कलश मिरवणूक सोहळा तसेच निमित्ताने किर्तन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. बुधवार, गुरुवार असे दोन दिवस हा भक्तीचा मळा फुलणार असून यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
आडस येथील आराध्यदैवत असलेले आडकेश्वर महादेव मंदिराचे ग्रामस्थांच्या सहकार्याने जिर्णोद्धार झाले. गावाची ओळख असलेले मंदिर आता देखणे झाले. गुरुवारी ( दि. २५ ) या मंदिराच्या कलशारोहण सोहळा आयोजित केला आहे. या निमित्ताने बुधवारी ( दि. २४ ) मंदिराचे कळस, नंदी, कासव,गणपती, पार्वती यांच्या पुतळ्याची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच गुरुवारी कलशारोहण निमित्ताने शि.भ.प.श्री. ष.ब्र. सद्गुरू काशिनाथ शिवाचार्य महाराज,पाथरी यांचे सकाळी १० ते १२ किर्तन आयोजित करण्यात आला. यानंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या सोहळ्याला आडस व परिसरातील भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.