खरीप पीक विमा भरण्यासाठी शेवटची तारीख जाहीर
लोकगर्जना न्यूज
खरीप हंगामातील पीक विमा तारीख शासनाने आज जाहीर केली. अंतिम मुदत ही घोषित केली.
शेतकऱ्यांना मोठा आधार ठरत असलेल्या प्रधान मंत्री पीक विमा योजने बाबतीत शासनाचा खरीप हंगाम २०२२ चा निर्णय जाहीर करण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकांचा विमा वेळेत भरता यावा म्हणून आज कृषी दिनाचे औचित्य साधून अंतीम मुदत जाहीर करण्यात आली. पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै २०२२ ही शेवटची तारीख आहे. या तारखे नुसार शेतकऱ्यांकडे पिकांचा विमा उतरविण्यासाठी ३० दिवसांची वेळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसांची वाट न पहाता सर्व्हर सुरू झाले की, पीक विमा भरून घ्यावा. जेणे करून शेवटी सर्व्हर डाऊन, लोडवर चालतो या समस्या जाणवतात. यामुळे शेतकऱ्यांनी त्या अगोदर आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.