क्राईम
अंबाजोगाई शहरात दुर्दैवी घटना

अंबाजोगाई : शहरातील दोन सख्ख्या बहिणींचा विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी उघडकीस आली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेख सानिया अल्ताफ ( वय १८ वर्ष ), शेख निदा अल्ताफ ( वय १६ वर्ष ) रा. फॉलोअर कॉर्टर असे मृत बहिणींची नावं आहेत. त्या मैत्रीणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या होत्या. परंतु आज ( दि. ४ ) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास येथील स्वाराती रुग्णालय समोरील कंपनी बाग येथे एक शासकीय विहीरीत मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दोन्ही मृतदेह विहितून काढले असून शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आले.