केज पोलीसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली!
धारदार शस्त्रांसह पाच जणांना पकडले
केज : रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला एक पांढऱ्या रंगाची कार व दोघेजण उभे दिसले. संशय आल्याने पोलीस त्यांच्या वाहनाकडे येत असल्याचे पाहून तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी झडप मारून त्यांना पकडले. झडती घेतली असता धारदार शस्त्र, तोंड झाकण्यासाठी काळा कपडा,सह मारतूल, लोखंडी पहार सह आदि साहित्य मिळून आले. ही टोळी दरोड्याच्या तयारीत होती का? असा संशय येत असून या पाचही जणांवर गुन्हा दाखल केला असून केज पोलीस तपास करीत आहेत. केज पोलीसांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
शहरातील कळंब रोडवर केज पोलीसांची जीप गस्तीवर असताना रात्री बाराच्या सुमारास विठाई पुरम समोर पुलावर एक पांढऱ्या रंगाची कार व दोन इसम काळया कपडयाने चेहरा झाकलेल्या आवस्थेमध्ये अंधारात संशयीत रित्या उभे दिसले. पोलीसांना संशय आल्याने कारच्या दिशेने जीप वळवून घेतली. पोलीस त्यांच्याकडे येत असल्याचे पाहून काळ्या कपड्याने चेहरा झाकलेले दोन इसम पळू लागले पाठलाग करुन त्यांना पकडले. इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी कार कडे धाव घेऊन आतमध्ये बसलेल्या तिघांना पकडले. नाव गाव विचारले असता त्यांनी उडवा उडविची उत्तरे दिली. विश्वासात घेवून विचारलं असता त्यांनी १)कैलास सखाराम पवार वय २८ वर्ष रा. लिंबा ता. पाथरी जि.परभणी, २)संतोष कोंडीराम सोनटक्के वय २५ वर्ष रा.गुंज (खु.) ता. पाथरी जि. परभणी,३)परमेश्वर सखाराम पवार, वय २० वर्ष रा.लिंबा ता. पाथरी जि.परभणी, ४)राहुल बालासाहेब कांबळे, वय २३ वर्ष रा. रा.गुंज (खु.) ता. पाथरी जि. परभणी,५) सुशिल मारोती चव्हाण, वय २० वर्ष रा.पिट बाभळगाव ता. पाथरी जि.परभणी असे सांगीतले. त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कार क्रमांक एम.एच.०५ ए.एस.९५८५ असा होता. सदर इसमांचे कमरेला धारदार हत्यार आणि कारमध्ये लोखंडी पहार (सब्बल) असे दरोडा घालण्याचे तयारी निशी संशयीत हत्यार असल्याने सदरची माहिती एएसपी पंकज कुमावत व सपोनि वाघमोडे यांना दिली. त्यांचे मार्गदर्शनाखाली दोन पंचांना बोलावून घेऊन इसमांची अंगझडती व कारची झडती घेतली असता मोबाईल, धारदार गुप्ती, चॉपर, कुऱ्हाड, रिंग पाना, मारतुल, दोन लोखंडी पहार (सब्बल) सह काही रक्कम तसेच चेहरा झाकण्यासाठी काळा कपडा बाळगून दरोडा घालून, विरोध केल्यास प्रसंगी धारदार हत्याराने मारहान करुन मालमत्ता लुटून एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून परभणी जिल्ह्यातील वरिल नावं असलेल्या पाच जणांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात दिलीप चंद्रभाण गित्ते पोलीस नाईक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पो.ह.बांगर, पो.ह.तांदळे,पो.ह.शेख वाहन चालक हनुमंत गायकवाड यांनी ही कारवाई केली. त्यांचे एएसपी पंकज कुमावत, केज ठाणे प्रभारी वाघमोडे यांनी कौतुक केले.