क्रीडा

केज तालुक्यातील मनोज इंगळे जिल्ह्यात पहिला

लोकगर्जनान्यूज

केज : तालुक्यातील कळमआंबा येथील राजीव गांधी विद्यालयाचा विद्यार्थी मनोज अंगद इंगळे यांनी ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशस्वी कामगिरी बद्दल त्याचे शाळेच्या वतीने सत्कार करुन कौतुक करण्यात आले. तसेच त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

बीड येथील सैनिक विद्यालयात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यामध्ये शनिवारी ( दि. २६ ) ६०० मीटर धावण्याची स्पर्धा झाली. यामध्ये राजीव गांधी विद्यालय, कळमआंबा ( ता. केज ) या शाळेचा विद्यार्थी मनोज अंगद इंगळे यांने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे अंतर काही क्षणातच पुर्ण करुन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. या यशस्वी कामगिरीमुळे शाळेची मान जिल्ह्यात उंचावली आहे. याबद्दल मनोजचे शाळेच्या वतीने सत्कार करुन कौतुक करण्यात आले. तसेच संस्थेचे सचिव रमेश आडसकर, सौ. अर्चना आडसकर, युवानेते ऋषिकेश आडसकर, मुख्याध्यापक रवी नखाते, शिक्षक पठाण व्ही. एम., राऊत बी. व्ही., ढोबळे एस.पी, सोळंके बी.एस. आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »