कृषी

केज तालुक्यातील तरुण करत आहेत शेतीमध्ये करीअर

आधुनिक शेतीतून फळबाग, फुलं, भाजीपाला पिकवून घेत आहेत भरघोस उत्पन्न

 

केज : करिअर म्हटले की, तरुण इंजिनिअर, डॉक्टर अथवा पुणे, मुंबईत चांगल्या पगाराची एखाद्या कंपनीत नौकरी कसेच समजले जाते. परंतु केज तालुक्यातील माळेगावच्या तरुणांनी याला फाटा देऊन चक्क शेतीकडे वळून करिअरला सुरुवात केली. यामध्ये कृषी पदविका घेतलेल्या तरुणांची संख्या वर्ग आता पारंपरिक पद्धतीच्या शेती ऐवजी शेतीकडे वळला आहे. साळेगाव येथील अनेक तरुण शेतीकडे वळत असून वेगवेगळी पिके घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत. त्यात काहीजण तर कृषी पदवीधारक देखील आहेत.

साळेगाव ( ता. केज ) गाव बीड जिल्ह्यासह बाहेरही जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. तसेच हे जसे जनावरांच्या आठवडी बाजारासाठी प्रसिद्द आहे. तसेच बाजारातील चुलीवरचे मटण ही प्रसिद्ध आहे. यासह आता भाजीपाल्याचे गाव म्हणून ओळखले जाउ लागले तर नवल वाटायला नको! येथील अनेक तरुण शेतीकडे वळले असून मेहनत व नियोजनाच्या बळावर ते टोमॅटो, पत्ता कोबी, ढोबळी मिरची यासह विविध भाजीपाला, फुलांची शेती तसेच टरबुज,खरबुज, केळी असे विविध फळ शेती करत भरघोस उत्पन्न घेत आहेत. या मेहनतीला निसर्गानेही चांगली साथ दिली असून दोन वर्षांपासून चांगला पाऊस होत असल्याने बोअर, विहिरींना पाणी टिकून आहे. त्यामुळे पाणी पुरत असल्याने मेहनत करण्यात मजा येत असून चांगले उत्पन्न निघत असल्याने मेहनतीचं चिज होत असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच शेती करणाऱ्या नवं तरुणांमध्ये सर्वच सुशिक्षित तरुण आहेत. त्यांनी नोकरीच्या मागे न लागता आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीमध्ये करुन शेतीत करिअर करतं आहेत. सध्या शेती असा उद्योग आहे ज्यामध्ये स्पर्धा नसून मोठं मोठ्या कंपन्या यामध्ये सरळ उतरण्याची भीती नाही. व्यवसायात सध्या खूप स्पर्धा वाढली आहे. लॉकडाऊनच्या नंतर अनेक व्यवसाय डबघाईस आली आहेत. परंतु शेतीच टिकून आहे. शेती हा व्यवसाय अथवा एक निर्मिती ( मॅनुफॅक्चर ) कंपनी म्हणून काम केले तर यश निश्चित असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. हे बदल या उच्च शिक्षित तरुणांनी कृतीतून दाखवून दिले असून, जिथे केवळ कापूस, ज्वारी, बाजरी, हायब्रीड हे पारंपरिक पिके घेण्यात येत होती. आता येथे दर्जेदार भाजीपाला, विविध फळांचे उत्पादन होत आहे. यातून अधिकचे चार पैसेही हातात खेळत आहेत. इंगळे गजानन, अविनाश गित्ते,गणेश पारखे,अंकुश इंगळे,राजाभाऊ वरपे,अमर मुळे,गोविंद टोपे या सर्वांनी कृषी विषयाची पदवी प्राप्त केली आहे. फ्लोत्पादन पदवी प्राप्त राजकुमार गित्ते हे कृषी पदविका प्राप्त शेतकरी आधुनिक शेती करत असून तसेच इतर गावातील समवयस्क मित्र व तरुणांना मार्गदर्शन करत त्यांनाही प्रोत्साहन देत आहेत. या मार्गदर्शनामुळे साळेगाव येथील इतरही तरुण शेतीकडे वळले आहेत. तेही भरघोस उत्पन्न घेत आहेत. शिक्षण घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी हे एक उत्तम उदाहरण असल्याचे म्हणत या माळेगावच्या तरुणांचे कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »