केज नगरसेवकांची गांधीगिरी

लोकगर्जनान्यूज
केज : येथील नगरपंचायतीला कायम स्वरुपी मुख्याधिकारी नाहीत. प्रभारी अधिकारी इकडे फिरकत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. यामुळे बुधवारी ( दि. २ ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी आंदोलन केले.
नगर पंचायत मध्ये नागरिकांची दररोज अनेक कामे असतात परंतु येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त नाही. त्यामुळे अनेकांची कामे खोळंबली आहेत. नागरिकांची ही गैरसोय पहाता राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भाऊसाहेब गुंड, बाळासाहेब गाडवे, शेख युनूस यांनी केज नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावे, जोपर्यंत कायमस्वरूपी मुख्याधिकारी येत नाहीत तोपर्यंत प्रभारी नियुक्त मुख्याधिकारी यांनी निदान आठवड्यातील दोन दिवस येथे हजर रहावे अशी मागणी करत बुधवारी ( दि. २ ) मुख्याधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी आंदोलन केले. याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.