केज तालुक्यातील ग्रामीण जनतेची वाट बिकट

केज : तालुक्यातील ग्रामीण रस्ते प्रवास करण्यायोग्य राहिलेले नाहीत . पाऊस पडला आणि रस्त्यावर गुडघाभर चिखल झालेला आहे हे रस्ते पांदण रस्ते आहेत. गुडघाभर चिखलात पायी चालता येत नाही आणि गाड्या चिखलात फसतात, ढकलाव्या लागतात त्यावेळी मात्र तोंडातून नकळत गौरव उद्गार प्रवासी काढत आहेत.
रस्त्यातून गाडी ढकलून काढावी लागते दुचाकी चालवणे अवघड झाले आहे
या प्रश्नाबाबत मात्र आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य कोणत्याच लोकप्रतिनिधींना व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना
या रस्त्याच देणे-घेणे दिसत नाही. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही यावर निधी उपलब्ध नाही,मंजुरी नाही अशी कारणे पुढे करून ही रस्ते वर्षानुवर्षे तशीच आहेत तर अनेक रस्त्यावरचा मंजूर निधी नेमका कुठे जातो याबाबत सर्वच अनभिज्ञ आहेत.कुठे थातुरमातुर खडी टाकून बिल उचलण्याचे उद्योग केले जात आहेत . गुडघाभर खड्डे पडलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी व्यवस्थित व्हायला हवे होते. पण झाले नाहीत.आता पावसाळ्यात हे पांदण रस्ते झालेत प्रवाशांच्या मरण यातना कधी कमी होणार हाच प्रश्न उभा आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
रस्त्यावर गुडघाभर पाणी आणि चिखल झाल्याने विद्यार्थ्यांना पायी सुद्धा जाता येत नाही यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत
रस्ते बघायचेत या रस्त्याने एकदा प्रवास करून बघाच
● सावळेश्वर ते आवसगाव
●सारणी ते आनंदगाव
●चंदनसावरगाव ते जवळबन
● सावळेश्वर ते जवळबन
● सावळेश्वर ते आवसगाव
● सोनीजवळा ते आनंदगाव
●कुंबेफळफाटा ते येडेश्वरी कारखाना धनेगाव फाटा
●धनेगाव फाटा ते धनेगाव
●इस्थळ ते होळ
●सौन्दना ते बनसारोळा
● उंदरी ते केज
●सौन्दना ते आवसगाव
●युसूफवडगाव ते बावची
●चंदनसावरगाव ते केकतसारणी
▪️आडस ते पिसेगाव
▪️आडस ते होळ
यांच्यासह ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते दूर अवस्थेमध्ये आहेत याकडे लक्ष घालून ते रस्ते व्यवस्थित करावेत अशी मागणी केली जात आहे.
वरील बहुतांश रस्त्यांवर जाताना केवळ दगड आणि गुडघाभर खड्डे पडलेले आहेत त्यात पाणी साचून चिखल झाला आहे. कुठेही डांबराचा पत्ता नाही. परिसरातील वाहतूक करताना अडथळा निर्माण होत आहे अनेकांना मणक्याचे आजार झाले आहेत. रुग्णांना दवाखान्यात नेत असताना ही रुग्णांचे मृत्यू सुद्धा झालेले आहेत मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही या रस्त्याचा प्रश्न मिटणार कधी ?हाच प्रश्न उभा आहे.
चिखलात पडून जीवित हानी झाल्यास लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करायला हवेत
तात्काळ रस्ते दुरुस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन
तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा ,संभाजी ब्रिगेड चे राहुल खोडसे ,सामाजिक कार्यकर्ते ऍड सुधिर चौधरी,दत्ता शिनगारे यांनी दिला आहे.
मढं घेऊन जाताना गाडी फसली
गावातील एका वृद्ध महिलेचे निधन झाले आणि रस्त्यावरून प्रेत घेऊन जात असताना गाडी फसल्याने दीड तासाचा उशीर झाला नातेवाईक मात्र आक्रोश करून वाट बघत होते
रस्त्यातच महिला बाळंतीन
आनंदगाव ते केज प्रवासादरम्यान गुडघाबर खड्ड्यामुळे रिक्षातच महिला बाळंतीन होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. तर रुग्ण दवाखान्यात घेऊन जात असताना मृत्यू झाल्याची घटना घडलेल्या आहेत.
ग्रामीण भागातील रस्ते तात्काळ करून नागरिकांच्या मरणयातना थांबवाव्यात अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे