घोणस अळीची दहशत कायम:केज तालुक्यातील तरुण शेतकरी दवाखान्यात दाखल

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील मुलेगाव येथील तरुण शेतकरी तुती कापत असताना घोणस अळीचा स्पर्श झाला ( डंक ) यामुळे त्रास होऊ लागल्याने अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामुळे घोणस अळीची दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
मागे बीड जिल्ह्यात घोणस अळी मुळे काहींना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर चांगलीच दहशत निर्माण झाली. पण यानंतर कुठेही घोणस अळीचा प्रकार ऐकण्यात आलं नाही त्यामुळे विसर पडला होता. परंतु मंगळवारी ( दि. १ ) केज तालुक्यातील मुलेगाव येथील शेतकरी राहुल शिवहार धारेकर ( वय २९ वर्ष ) हे स्वतःच्या शेतातील तुतीचे पान कापताना घोणस अळीचा ( डंक ) स्पर्श झाल्याची दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.यानंतर हातात आग पडून जड पडला. त्रास सहन होत नसल्याने प्रथम आडस येथे व नंतर अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत. उपचारानंतर काही अंशी त्रास कमी झाला असून आग मात्र कायम असल्याची माहिती राहुल यांनी लोकगगर्जनान्यूजशी बोलताना दिली. यावरून घोणस अळीचे संकट कायम आहे. यामुळे शेतात काम करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.