केज-कळंब रस्त्यावर कारची दुचाकीला धडक दुचाकीस्वार गंभीर; चालक कारसह फरार
केज-कळंब रस्त्यावर कारची दुचाकीला धडक दुचाकीस्वार गंभीर; चालक कारसह फरार
केज : तालुक्यातील माळेगाव जवळ एका अज्ञात कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना काही वेळापूर्वी दुपारी सव्वाचार वाजता घडली. दुचाकीस्वार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना त्याला मदत न करता कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. सदरील कार ही केजच्या दिशेने आली आहे.
आज रविवारी ( दि. १६ ) दुपारी सव्वाचार च्या सुमारास कळंबकडू केजच्या दिशेने जात असलेल्या भरधाव कारने साळेगांव येथे गालफाडे यांच्या शेता जवळ समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार नंदकुमार जोगदंड, रा. भाटुंबा ( ता. केज ) हा गंभीर जखमी झाला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना थांबून मदत करणं आवश्यक असताना कार चालकाने अपघात स्थळावरून पळ काढला. अरुण झाडबुके आणि जय जोगदंड यांनी पोलिसांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली.