क्राईम
केज-कळंब रस्त्यावर कंटेनर-टेम्पोची धडक
केज- कळंब रोडवर कंटेनर आणि टेम्पोची समोरा समोर धडक होऊन त्यात टेम्पो चालक जखमी झाला आहे.
गुरुवार (दि.२) रोजी सकाळी ६.३० वा. केज- कळंब रोडवर चिंचोली पाटी जवळील पुलावर कंटेनर क्र. (एमएच-१२ /एफझेड-३६१०) आणि टेम्पो क्र. (एमएच-२१/९५७८) यांची समोरा समोर धडक झाली. यात टेम्पो ड्रायव्हर सलमान कुरेशी रा अहमदपूर हा जखमी झाला आहे.