भवताली

केज येथे मणिपूर घटनेच्या निषेधार्थ सोमवारी निषेध मोर्चा काढण्यात येणार

लोकगर्जनान्यूज

केज : महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. ही घटना देशाची मान खाली घालणारी असून, या घटनेचा निषेध करण्यासाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी ( दि. 24 ) सकाळी 11 वाजता निषेध मोर्चाचे आयोजन केले. यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे हनुमंत भोसले यांनी केले.

देशाचे घटकराज्य असणाऱ्या मणिपूर मध्ये महिलांची नग्न धिंड काढून गुंडांनी त्यांच्यावर केलेले अत्याचार हे या देशातील समस्त महिला व या देशाच्या अस्मितेवर प्रचंड मोठा आघात आहे. विषेश म्हणजे यातील एक महिला ज्या सैनिकाने देशाच्या कारगिल युद्धात शत्रूला धूळ चारली अशा सैनिकांची पत्नी असल्याचे कळते. या महिला कोणत्या, धर्म, जाती व समूहाच्या आहेत यापेक्षा त्या भारत देशाच्या नागरिक आहेत. आमच्याकडे अन्याय करणाराची जात व धर्म पाहून निषेध नोंदवण्याची परंपरा आहे. ही वृत्ती राजकारणाला पोषक असली तरी देशाच्या ऐक्यासाठी खूपच घातक आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवार ( दि 24 ) सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय मुकमोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. केज शहरातील समाजप्रेमी नागरिकांनी या वेळी उपस्थित राहावे असे आवाहन केज विकास संघर्ष समिती च्या वतीने समन्वयक हनुमंत भोसले, केज संघर्ष माजी सैनिक संघटना अध्यक्ष मेजर अजिमोद्दीन शेख, राम राऊत मेजर, राजेंद्र बारगजे मेजर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »