केज-कळंब रस्त्यावर अपघात: दोन ठार
लोकगर्जना न्यूज
केज : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाल्याची घटना शुक्रवारी ( दि. १२ ) रात्री केज-कळंब रस्त्यावर सुर्डी पाटी जवळ घडली आहे. हा अपघात नेमका कसा घडला याबाबत अधिक माहिती समोर आली नाही.
प्रकाश साहेबराव घोडके, संदीप श्रावण घोडके रा. चिंचोली माळी ( ता. केज ) असे दोघा मयताची नावे आहेत. हे दोघे असलेल्या दुचाकीला शुक्रवारी रात्री केज-कळंब रस्त्यावर सुर्डी पाटी जवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह केज येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी दाखल केले. हा अपघात नेमका कसा घडला व कोणत्या वाहनाने धडक दिली याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेने चिंचोली माळी गावावर शोककळा पसरली असून एकाच दिवशी गावातील दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.