प्रेरणादायी! बीड जिल्ह्यातील या शहरातला तरुण बनला पायलट

लोकगर्जना न्यूज
बीड : जिल्ह्यातील धारुर या छोट्याशा शहरातील तरुणाने चिकाटीने मेहनत करत शंतनु भावठाणकर यांनी पायलट होण्याचे स्वप्न साकार केले. अमेरिकेत प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर बुधवारी ( दि. १७ ) त्याने प्रथमच ( पाईप वोरियर ) विमानाचे प्रथमच उड्डाण केले. शंतनु यांचे कौतुक होत असून या भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी असे कार्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्हा म्हटलं की, मागासलेला भाग, ऊसतोड मजूर पुरवणारा जिल्हा अशी ओळख सांगितली जाते. परंतु हा जिल्हा अधिकारी, यशस्वी उद्योजक, वजनदार नेते यांचा ही असून आता धारुर येथील शंतनु भावठाणकर यांच्यामुळे पायलटचा ही असल्याचं सांगितलं जाईल. धारुर म्हटलं तर या शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. परंतु शहर म्हटलं तर छोटं असा उल्लेख करावा लागेल. येथील सराफा व्यापारी धनंजय भावठाणकर यांचा मुलगा शंतनु हा कमर्शियल ( व्यवसायिक ) पायलट झाल आहे. पायलट होण्याचा शहरातून पहिला मान मिळाला. शंतनु यांचे प्राथमिक शिक्षण हे धारूर शहरातच आणि तेही जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण लातूर आणि नेवासा येथे झाले. शंतनु यांचे शालेय जीवनापासून पायलट होण्याचे स्वप्न होतं. १२ वी पुर्ण होताच स्वप्न साकार करण्यासाठी पहिलं पाऊल टाकत एमआयटी महाविद्यालय औरंगाबाद येथून अभियांत्रिकी पदवी घेतली. यानंतर मग मुंबई येथून एअर लाईन्स प्रिप्रेशन मधून डीजीसीए परिक्षा पास झाले. हा म्हत्वाचा टप्पा पार केल्यानंतर अमेरिकेत २ फ्लाय एअरबोर्ण फ्लोरिडा मध्ये प्रवेश मिळाला. येथे प्रशिक्षण घेतले व प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर बुधवारी ( दि. १७ ) प्रथमच पाइपर वोरिएर विमानाचे यशस्वी उड्डाण केले. स्वप्न साकार होत असल्याने आकाश ठेंगणे झाले. या मेहनतीमुळे शंतनु धनंजय भावठाणकर हे शहरातील पहिले कमर्शियल पायलट बनले आहे.