उमरी रस्त्यासाठी 5 डिसेंबर पासून घंटानाद/थाळीनाद आंदोलन

लोकगर्जनान्यूज
केज: शहर अंतर्गत रस्त्याचे प्रत्यक्ष काम एक महिन्याच्या आत निविदा काढून सुरू करण्यात येईल असे लेखी अश्वासन केज नगरपंच्यायत ने देऊनही एक महिना संपत आला असताना अद्याप निविदा प्रक्रिया अथवा अथवा इतर अत्यावश्यक कार्यवाही सुरू केली नसल्याने 5 डिसेंबर पासून लोक सहभागाने केज नगरपंच्यायत समोर बेमुदत घंटानाद व थाळीनाद आंदोलन करण्याचा निर्णय केज विकास संघर्ष समितीने घेतला आहे.
उमरी रस्त्याच्या मजबुती व काँक्रेटिकरण करण्यासाठी केज विकास संघर्ष समिती गेली अनेक वर्षे विविध आंदोलनाच्या रूपाने पाठपुरावा करत आहे. आता या रस्ता कामासाठी केज नगरपंच्यायत कडे 98 लक्ष एवढा निधी मंजूरही झाला आहे. मात्र केवळ निविदा काढून हे काम करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी विनाकारण केज नगरपंच्यायत विलंब करत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब अत्यंत चुकीची व तितकीच गंभीर असल्याचे समितीचे मत आहे. अगोदरच केज शहर विकासापासून वंचित असताना नवीन सत्ताधारी बॉडीने मंजूर कामे तात्काळ पूर्ण करून जनतेला दिलासा देणे गरजेचे असताना उमरी रस्त्यासारखा महत्वाचा प्रश्न कारण नसताना प्रलंबित ठेवणे चुकीचे आहे. लेखी आश्वासने देऊनही कामे न करणे गैर आहे. जर कामे करायची नसतील तर जनतेला खोटी आश्वासने देणे सत्ताधाऱ्यानी टाळावे असेही समितीने म्हटले आहे. जर उमरी रस्त्याचे काम निविदा काढून येत्या 4 डिसेंबर पूर्वी सुरू केले नाही तर येत्या 5 डिसेंबर पासून केज नगरपंच्यायत समोर नागरिकांच्या सहभागाने बेमुदत घंटानाद/थाळीनाद आंदोलन करणार असल्याचे समन्वयक हनुमंत भोसले, नासेर मुंडे, अजीम इनामदार, अतुल गवळी, बाळासाहेब देशमुख इत्यादींच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.