इन्स्टाग्राम मित्राकडून तरुणीवर अत्याचार;परळी पोलीसात आरोपीवर गुन्हा दाखल
लोकगर्जनान्यूज
परळी : येथील तरुणीची परजिल्ह्यातील तरुणाशी इन्स्टाग्रामवर झाली ओळख झाली. यानंतर गाठीभेटी सुरू झाल्या याचा फायदा उचलत तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून शहराबाहेर निर्जन स्थळी नेऊन शारिरीक संबंध निर्माण करत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
परभणी जिल्ह्यातील नराधम आणि परळी येथील तरुणीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत तरुणाने जवळीक साधत तरुणीला आपल्या जाळ्यात फसवले यानंतर यांच्या बाहेर गाठीभेटी सुरू झाल्या, वेळ मिळेल तेव्हा हे दोघे गार्डन मध्ये भेटत असत. एका दिवशी तरुणाने शहराच्या बाहेर नेऊन २० सप्टेंबर २०२४ रोजी निर्जनस्थळी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी पिडीत तरुणीने शनिवारी ( दि. ६ ) एप्रिल तक्रार दिली. त्यावरुन परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी शुभम शिवाजी मुजमुले रा. उपळी ( ता. गंगाखेड जि. पथभणी ) याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत.