लोकगर्जनान्यूज
केज : आ.नमिता मुंदडा यांनी आज सकाळी केज शहरात रॅली काढून व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच ठिकठिकाणी आ.नमिता मुंदडा यांचे मतदारांनी स्वागत केले.
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, एसआरपी व इतर मित्र पक्ष केज 232 विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच प्रचाराला सुरुवात केली आहे. मागील पाच वर्षांत त्यांनी मतदारसंघात आणलेल्या कोट्यावधी रुपयांचे केलेल्या कामाच्या जोरावर त्या मतदारांच्या समोर जात आहेत. तर मागील दोन दिवसांत आमदार मुंदडा यांनी अंबाजोगाई शहर पिंजून काढल्या नंतर आज सकाळी मुंदडा यांनी केज शहरात रॅली काढली. या माध्यमातून मंगळवार पेठ, बसस्थानक ते कळंब चौक, वसंत महाविद्यालय रस्ता सह आदी भागात फिरुन व्यापाऱ्यांशी आणि सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला, तर दिवळीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या. या रॅलीला केज वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आमदार मुंदडा यांचे ठिकठिकाणी मतदारांनी स्वागत केले. त्यांच्या संपर्क दौऱ्यामुळे त्या प्रचारातही नंबर वन दिसत आहेत. मतदारांचा वाढता पाठिंबा पहाता मुंदडा यांच्या पाठीशी शेतकरी, मजुर, सामान्य माणूस दिसत आहे.