आयफोन सारखे फीचर असणार ‘हा’ मोबाईल मिळतोय इतक्या कमी बजेटमध्ये!
लोकगर्जनान्यूज
आपल्याकडे स्मार्टफोनचे खूप चाहते आहेत. हे फोन वापरणाऱ्या प्रत्येकाची इच्छा असते की, आपल्याकडे आयफोन ( I phone ) असावं,पण त्याच बजेट इतकं आहे की, ही इच्छा पूर्ण करणे अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे. परंतु याला आयटेल एस २३ + ( itel s23+ ) हा चांगला पर्याय उपलब्ध झाला. यामध्ये आयफोन सारखे फीचर असून हा फोन केवळ 14000 हजार रुपयात मोबाईल चाहत्यांना मिळणार आहे. तर याचे सर्व फीचर्स व सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी बातमी पुर्ण वाचा.
आयफोन घ्यायचं पण तेवढं बजेट नाही यामुळे आयफोन सारखे फीचर असणारा मोबाईल बाजारात आहे का? याचा शोध घेत असलेल्या मोबाईल चाहत्यांसाठी itel कंपनीने आनंदाची बातमी दिली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी itel या स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या कंपनीने ( itel s23+ ) हा मॉडेल लॉन्च केला. यामध्ये मोबाईल शोकींसाठी अनेक भन्नाट असे फिचर्स दिली. यामध्ये ओटीए ( OTA ) अपडेट्स सह कॅमेरा ऑप्टिमायझेशनसह ए. आर. AR मेजर फीचर्स सह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यामुळे हा मोबाईल अनेक प्रीमियर स्मार्टफोन्सला टक्कर देत असल्याचे दिसून येत आहे. रिपोर्ट नुसार फोनच्या सिक्युरिटी बाबत देखील अपडेट मध्ये बदल करण्यात आले. यूजर ना आपत्कालीन परिस्थितीत देखील अलर्ट प्राप्त होणार असून त्यासाठी विशेष सेटिंग करावी लागेल. या सुविधांची गरज सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा धोका असलेल्या भागातील लोकांसाठी होऊ शकतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला फेस अनलॉक, चार्जिंग ॲनिमेशन, बॅक ग्राउंड कॉल , चार्जिंग पूर्ण आणि बॅटरी लो झाल्याचे रिमाइंडर सारखे अनेक फीचर्स सुरु किंवा बंद करू शकता. डायनामिक बारचा वापर करणे देखील खूप सोपं झाल, या ( itel s23+ ) स्मार्टफोनच्या स्क्रीनवर स्लाईड केल्यास डायनामिक बार दिसेल. यामुळे वापरकर्ता कोणत्याही ॲप वरती टॅप करून त्यावर जाऊ शकतो . नवीन अपडेट मध्ये कॅमेरा सॉफ्टवेअरही देण्यात आले असून यामुळे फोटो आणि व्हिडिओच्या गुणवत्तेत कमालीचा बदल जाणवणार आहे. तसेच कॅमेरा फोकस एडिट पर्यायमध्ये बदल करून तो अधिक अद्यावत करण्यात आला.
असा आहे डिस्प्ले व प्रोसेसर
Itel s23+ हा एक जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन असून यामध्ये 6.78 इंचचा 60 Hz अमोलेढ ( Amoled ) कर्व्ह डिस्प्ले मिळतो.तसेच या स्मार्टफनमध्ये Unisoc Tiger T616 हे प्रोसेसर देण्यात आले असल्याने वापरकर्त्यांना मल्टी टास्किंग आणि गेमिंग साठी पुरेसा बॅकअप मिळतो.
असा आहे कॅमेरा….
फोटोग्राफी शोकीनांचा विचार करुन itel s23+ या स्मार्टफोनला कॅमेरा एकदम जबरदस्त देण्यात आला आहे. यामध्ये 10 x पर्यंत झूम आणि LED फ्लॅश सोबतच 50 MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला. तर, सेल्फी साठी 32 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला. यामुळे फोटोग्राफी करणाऱ्यांना एक वेगळाच अनुभव येईल.
इतका आहे रॅम
Itel s23+ स्मार्टफोनमध्ये 8 GB पर्यंत रॅम आणि 256 गब पर्यंत स्टोरेज देण्यात आला असून यात अतिरिक्त 8 GB व्हर्च्युअल रॅम देखील सपोर्ट करतो.
बॅटरी….
हा मोबाईल फीचर्स बाबतीत जबरदस्त असून तुम्हाला प्रश्न पडला असेल की, बॅटरी कशी आहे. तर बॅटरी बॅकअप चांगले मिळावे याचा कंपनीने विचार करुन यामध्ये 5 हजार Mah ची बॅटरी दिली आहे.