शिक्षण संस्कृती

आनंदनगरी नव्हे जत्राच! २०० दुकानं अन् ५ लाखांपेक्षा जास्त उलाढाल

चिमुकल्यांनी केली पालेभाजी सह टरबूजाची केली विक्री

लोकगर्जनान्यूज

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील खोलेश्वर विद्यालायाकडून आनंदनगरीचे आयोजन केले. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी होत विविध पदार्थ व भाजीपाला सह फळांचे २०० दुकान ( स्टॉल ) लावलं होतं. यामुळे या आनंदनगरीला जत्रेचे स्वरूप आले. यामध्ये चिमुकल्या व्यापाऱ्यांनीआनंदनगरीत तब्बल ५ लाख २० हजार रुपयांची उलाढाल केल्याची माहिती शाळेकडून देण्यात आली. हा आकडा ऐकून आश्चर्याचा धक्का बसला आहे. मुलांच्या आनंदनगरीत सहभागी होत पालकांनीही मनमुराद आनंद लुटल्याचे दिसून आले.

पुस्तकांमधून ज्ञान मिळतो परंतु व्यवहारीक ज्ञान व चातुर्य अनुभवातून मिळतो. त्यामुळे बाजारहाट कसा करावा याचे कौशल्य बालवयात आत्मसात व्हावे यासाठी विद्यालयाने हा उपक्रम राबविला. या आनंदनगरीत बालगोपाळ हे मोठ्या माणसांपेक्षाही सरस ठरले. आपल्या वस्तुंचा उत्तम दर्जा ग्राहकांना पटवून देत चिमुकल्यांनी मोठा गल्ला जमवला. जवळपास २३५ विद्यार्थी सहभागी होत त्यानी एकूण २०० वेगवेगळी दुकाने थाटली होती. यामध्ये मिठाई, भाजीपाला, पुस्तके, रेडीमेड कपडे, फळे ,आदींची दुकाने होती. तसेच वडापाव, गरम भजे, गुलाबजामुन, भेळ आदि खाऊंचे स्टॉल खवय्या ग्राहकांना आकर्षित करत होतेतर, मातीची भांडी, रोपवाटिका नर्सरी सह बास्केटबॉल, मेनबत्ती पेटवणे, नेमबाजी या गम्मतदार खेळाने आनंदनगरीत रंगत भरली. या मुलांच्या आनंदात सहभागी होऊन पालकांनी यावेळी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावून मनसोक्त खरेदी करत विद्यार्थी पाल्य व आजचे व्यापाऱ्यांचे मनोबल वाढवले. आनंदनगरीचे उद्घाटन दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या स.पो.नि. प्रभा पुंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संजय बारवकर ( संचालक खोलेश्वर विद्यालय ) होते. प्रमुख पाहूणे म्हणून पो.उपनि. ज्ञानेश्वर राडकर, गणेश सोळंके , ऋषिकेश मोरे ,प्रकाश कुलकर्णी, विलास पारेकर, डॉ. सतीश जाधव, डॉ. दत्ता भुजबळ, विजय कदम, नारायण चांदबोधले, पत्रकार संतोष स्वामी, माऊली कटारे,भागवत साबळे, आदींची उपस्थिती होती.
आनंदनगरी यशस्वी करण्यासाठी दिलीपराव पारेकर ( अध्यक्ष खोलेश्वर समुह) व प्राचार्या सरिता फपाळ, रोहिणी पारेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आज बाजारपेठा थंड असताना या एका शाळेच्या आनंदनगरीत ५ लाखांपेक्षा जास्त उलाढाल होणं हे साधी गोष्ट नसून यामुळे या चिमुकल्या व्यसखयिकांचे कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »