ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा आणणारा भगीरथ लोकनेते बाबुराव आडसकर यांची आज ९३ वी जयंती

लोकगर्जनान्यूज
अस्सल रांगड्या ग्रामीण भाषेतील भाषणातून महाराष्ट्राला भूरळ घालणारे बीड जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील भीष्म पितामह लोकनेते बाबुरावजी आडसकर यांनी राजकीय, सहकार क्षेत्रा बरोबरच श्री.छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खेड्या पाड्यामध्ये शाळेच जाळ निर्माण करून,गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली. यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा आणणारा भगीरथाची आज शुक्रवारी ( दि. २ ) ९३ वी जयंती आहे.
लोकनेते बाबुरावजी आडसकर अध्यक्ष आसलेल्या श्री.छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थे मुळे आडस येथे पदवी पर्यंत शिक्षणाची सोय आहे.मात्र आडसकर साहेबांच्या बालवयामध्ये येथे केवळ अक्षर ओळख व्हावी इतकच शिक्षण मिळत असे,तर काही जणांचे चौथी पर्यंत शाळा होती असे म्हणणं आहे. या नंतर अंबाजोगाई येथे पुढील शिक्षणासाठी जावे लागायचे तेथे जाण्या-येण्यासीठी कोणतीच सोय नव्हती.यामुळे पायी चालत जावे लागत असे. शिक्षण घेण्यासाठी मोठ्या आडचनींचा सामना खेड्या पाड्यातील मुलांना सहन करावा लागत होता.त्या काळामध्ये हेचं चित्र प्रत्येक खेड्याच होतं. या अडचणींवर मात करत आडसकर साहेबांनी १० वी पर्यंत शिक्षण घेतले. यामुळे त्यांना ग्रामीण भागातील मुला-मुलींना त्यांच्या गावात किंवा गावाच्या आस पास शिक्षणाच्या संधी निर्माण व्हाव्यात,त्यांनी भरपूर शिक्षण घेउन सक्षम नागरीक बनावे असे वाटत होते.ही इच्छा स्व.बाबुरावजी आडसकर साहेबांनी ते अध्यक्ष असलेल्या श्री.छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केज,धारूर, अंबाजोगाई, वडवणी या चार तालुक्यातील खेड्या पाड्यामध्ये शाळा उघडून शेतकरी, शेतमजुर सह सर्वसामान्यांच्या मुला-मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडी करून दिली आहेत.सध्या या संस्थेच्या ग्रामीण भागात ३५ शाळा सुरू आहेत.या शाळांमध्ये सर्वसामान्यांची ८ ते १० हजार मुल- मुली शिक्षण घेत आहेत.तर ६०० च्या जवळपास कर्मचारी आहेत. आडस येथे श्री.छ.शि.महाविधालय आणि केज येथे बाबुराव आडसकर महाविद्यालयाच्या माध्यमातून पदवी पर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. काळाची गरज ओळखून नाविन्यपूर्ण सी.बी.एस.सी.पॅटर्न शारदा इंगलीश स्कुल केज येथे सुरू केले. अल्प काळात या इंगलीश स्कुल ने केज,धारूर,अंबाजोगाई, कळंब या चार तालुक्यामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. तसेच केज येथे कमल नर्सिंग कॉलेज आणि वसंत पॉलटेक्निक कॉलेज सुरू करून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय पुरक शिक्षणाचे दालन उपलब्ध करून तरूणांना स्वत्त:च्या पायावर उभे रहाण्यासाठी मोठी मदत केली. त्या काळी लावलेल्या रोपट्याचा आता मोठा वटवृक्ष झाला आहे. या वटवृक्षाच्या सावली खाली बसून वाघिणीचे दूध ( शिक्षण घेऊन ) पिऊन अनेकजण आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. अशी दूरदृष्टी असलेले लोकनेते कै. बाबुरावजी आडसकर यांची आज शुक्रवार ( दि. २ ) डिसेंबर ९३ वी जयंती आहे. त्यांच्या कार्यावर लिहण्यास सुरुवात केली तर एक मोठा ग्रंथ होईल. परंतु या निमित्ताने लोकगर्जनान्यूज ने धावता आढावा घेण्याचा केलेला छोटासा प्रयत्न. सदैव साहेब आठवणीत राहतील…..