आपला जिल्हा
आडसच्या तरुणाला एलआयसीचा एमडीआरटी मानाचा पुरस्कार
आडस : येथील एलआयसी एजंट योगेश महारुद्र आकुसकर या तरुणाला एमडीआरटी २०२२ अमेरिका हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल योगेशवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अवघ्या अडिच वर्षांपूर्वी योगेश आकुसकर यांने भारतीय जीवन बिमा निगमचा ग्रामीण एजंट म्हणून काम सुरू केले. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, उत्तम सेवेच्या बळावर या तरुणाने २२५ जणांचा विमा उतरवला. अल्पकाळात एलआयसीचा सर्वोच्च असा मानला जाणारा एमडीआरटी २०२२ अमेरिका हा पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल योगेश आकुसकर यांचे शाखाधिकारी प्रवीण कुलकर्णी, उपशाखाधिकारी गोपाळ जायले, विकास अधिकारी गोविंद तोडकर, अविनाश चव्हाण ,अभिजीत वाघमारे,नसिर शेख,सुरज लोंढे,दिपक मोरे,अजीस बागवान,गोरख जोगदंड यांच्या सह आदींनी अभिनंदन केले.