क्राईम

अंबाजोगाई तालुक्यातील हृदयद्रावक घटना! धुणे घेऊन तलावावर गेले अन् विपरीत घडलं

लोकगर्जनान्यूज

अंबाजोगाई : धुणे धुण्यासाठी गेलेले दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील अंबा साखर ते लोखंडी सावरगाव रस्त्यावर एका तलावात आज गुरुवारी ( दि. ५ ) दुपारी घडली आहे. ही घटना परिसरात समजतात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अश्विनी लहू जाधव, रोहित परमेश्वर चव्हाण असे दोघां मयताची नावं आहेत. दसरा हा सण आता जवळ आल्याने घराची साफसफाई व धुणे धुण्याची लगबग सुरू आहे. लवकर धुणे धुण्याची व्हावीत म्हणून घरातील सर्वच सदस्य घरातील महिलांना मदत करण्यासाठी जातात. आज सकाळी अंबा साखर कारखाना परिसरातील दोन कुटुंब धुणे धुण्यासाठी लोखंडी सावरगाव रस्त्यावर प्रस्तावित उपप्रादेशिक परिवहन ( R T O ) कार्यालय समोर असलेल्या एका शेत तलावावर धुणे धुण्यासाठी आले. यावेळी अश्विनी लहू जाधव ही मुलगी पाण्यात पडली ती बुडू लागल्याने बाजुलाच असलेल्या रोहित चव्हाण याने मुलीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. परंतु दोघेही पाण्यात बुडाले व वरच आले नाही. त्यामुळे घटनास्थळी उपस्थितांनी आरडाओरडा केली. ही आरडाओरडा ऐकून काही जण धावून आले परंतु त्यांनाही या दोघांना बाहेर काढण्यात अपयश आले. यानंतर घटनेची माहिती जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांना मिळाली. त्यांनी यंत्रणा हलवत काही कार्यकर्त्यांना घटनास्थळी पाठविले. यानंतर अनेकांनी तलावात उतरुन शोध सुरू केला. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. शवविच्छेदनासाठी मृतदेह स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »