होळ येथे ट्रॅव्हल्स दुभाजकवर पलटी: अनेक प्रवासी जखमी

लोकगर्जनान्यूज
केज : ट्रॅव्हल्स दुभाजकावर गेल्याने पलटी होऊन घडलेल्या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची घटना आता काही वेळापूर्वी अंबाजोगाई-केज रस्त्यावर होळ येथे घडली आहे. जखमींना विजय ( बापू )केंद्रे सह ग्रामस्थांनी केली.
देवदर्शनासाठी भिवंडी ( मुंबई ) येथील ट्रॅव्हल्स क्रमांक एम.एच. ०४ जी पी १३८८ आली होती. अंबाजोगाई – केज रस्त्यावर होळच्या बसस्थानकावर ट्रॅव्हल्स चालकाला रस्त्यावरील दुभाजक दिसला नाही. ट्रॅव्हल्स दुभाजकावर चढली यामुळे पलटी झाली. यामध्ये दहा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात ऐन बसस्थानकावर घडल्याने विजय बापू केंद्रे यांनी धाव घेतली ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना मदत केली. या रस्त्यावर खूप लहान दुभाजक असल्याने रात्रीच्या वेळी तो दिसत नाही. त्यामुळे दुभाजकाची उंची वाढवणे गरजेचे असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. अन्यथा यापुढेही अपघाताच्या घटना घडू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे. बसवकल्याणकडे अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स चालली होती. सर्व किरकोळ जखमी आहेत.