जनावरांचे भांडण …माणसात गेली अन् माणसांची… ठाण्यात

केज : भांडण झालं गाईचं अन् शेळीचं; त्या नंतर दोन्ही जनावरांच्या भांडणा वरून त्यांच्या मालकात हाणामारी झाली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे जनावरांचे भांडण माणसात गेली अन् माणसांची.. पोलीस ठाण्यात अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी ( दि.२७ ) नांफूरघाट ता. केज येथील अशोक तुकाराम जाधव यांच्या गाईने बिस्मिल्ला शेख यांच्या शेळीला मारलं. या कारणावरून गाय व शेळीच्या मालिकांमध्ये बाचाबाची झाली अन् त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. असद दस्तगिर शेख याने अशोक तुकाराम जाधव यांना काठीने मारून जखमी केले. तसेच बिस्मिल्ला शेख व असद दस्तगिर शेख या दोघांनी अशोक तुकाराम जाधव याला संगमनंत करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या आशयाची फिर्याद अशोक तुकाराम जाधव यांनी ( दि. २८ ) शुक्रवारी दिली. त्यावरून केज पोलीस ठाण्यात बिस्मिल्ला शेख व असद दस्तगिर शेख या दोघा विरुद्ध गु.र.नं. २४/२०२२ भा.दं.वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अभिमान भालेराव हे पुढील तपास करीत आहेत