क्राईम

केजमध्ये चोरट्यांची दहशत मारहाण करत दोन ठिकाणी चोरी; मारहाणीत महिला गंभीर जखमी

 

केज : शहरातील शिवाजी नगर आणि एका शेत शेतवस्तीवर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घराचे गेट तोडून दोन ठिकाणी चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एक लाख रु. किंमतीचा ऐवज लंपास केला.

(दि. ३१) नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला मध्यरात्री २:०० वा. च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी केज-कळंब रोडवरील शिवाजी नगर येथील भगवान जमाले यांच्या घराच्या लोखंडी चॅनेल गेटचे कुलूप तोडून आत घुसले. त्यावेळी भगवान जमाले यांची पत्नी सरस्वती जमाले या आवाज ऐकून दार उघडुन बाहेर आल्या. त्यावेळी चोरट्याने तिच्या डोक्यात लोखंडी गज मारुन जखमी केले.घरातील लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रु. असा ऐवज चोरून नेला. त्या नंतर आरडाओरड ऐकून नागरिक जागे झाल्या नंतर चोरटे पळून गेले. यानंतर चोर शिवाजी नगर पासून एक कि.मी. अंतरावर जवळच असलेल्या खंडोबाचा माळ येथील गुंड वस्तीवर गेले. तेथे त्यांनी अशोक रामभाऊ गुंड यांचे घराचे दरवाजा तोडून त्यांना मारहाण करून लोखंडी कपाटातील मंगळसूत्र गंठन व कानातील झुंबर आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला.या घटनेत सरस्वती जमाले या गंभीर जखमी असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी हलविले आहे. तर अशोक गुंड हे किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत,केजचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी घटना स्थळी भेट देऊन घटना पहाणी केली. तपासच्या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »