वरुन कला आतून देहविक्री;महिला व आंबट शौकीन मिळून 36 जणांवर गुन्हा दाखल

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील एका कला केंद्रावर छापा मारला असता अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. येथे कला केंद्राच्या नावाखाली चक्क देहविक्री होत असल्याने समोर आले असून, यासाठी अल्पवयीन मुलींचाही वापर होत असल्याचे आढळून आल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे सह महिला व आंबट शौकीन मिळून 36 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
केज तालुक्यातील उमरी शिवारात महालक्ष्मी नावाचे कला केंद्र आहे. या कला केंद्राचे फक्त नाव असून येथे दुसरीच कला क्रिडा खेळली जाते अशी माहिती सहायक पोलीस अधीक्षक ( Asp ) पंकज कुमावत यांना मिळाली होती. यावरून गुरुवारी रात्री उशिरा सदरील कला केंद्रावर पोलीसांनी छापा टाकला असता तेथे डीजे लाऊन चार वेगवेगळ्या खोल्यांमध्ये महिला नृत्य करताना आढळून आले. यावेळी अनेक आंबट शौकीन ही होते. तसेच येथे दारु,खुटखा सह वापरलेले कंडोम मिळून आले. यावरून येथे कला केंद्राच्या नावाखाली चक्क देहविक्री होत असल्याचा पोलीस छाप्यात उघड झाले. या कला केंद्रात उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदेची पार्टनरशिपमध्ये असल्याचे दिसून आल्याने आरोपींमध्ये समावेश आहे. छाप्या मध्ये मिळून आलेल्या एकूण 36 महिला व आंबट शौकीनावर विविध कलमानुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस अधीक्षक ( Asp ) पंकज कुमावत करीत आहेत.
अल्पवयीन मुलगी आढळून आली
विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने पैशाचे आमिष दाखवून मला येथे आणले आहे. माझ्याकडून नृत्य करुन घेत असून, एका केबिन मध्ये लैंगिक शोषण , वेश्याव्यवसाय करुन घेतात असा जबाब दिला. अल्पवयीन मुलींनाही येथे आणले जात असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.