इस्रो सहल निवड परीक्षेत शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ!

लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यात 27 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या पाचवी ते आठवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी केंद्रस्तरीय निवड चाचणीत उर्दूच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाचा पेपर देण्यात आला. यामुळे उर्दू माध्यमांच्या मुलांवर एक प्रकारे अन्याय झाल्याचे समोर आले. तसेच पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच प्रश्न पत्रिका देण्यात आली. यामुळे जि.प. शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. उर्दू माध्यमांच्या मुलांची फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी शिक्षक संघटना आणि पालकांमधून होत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयी आवड निर्माण व्हावी व देशाला चांगले वैज्ञानिक मिळावे यासाठी जि. प. शिक्षण विभागाच्या माध्यमातून सोमवारी जिल्ह्यात केंद्र स्तरावर पुढील निवडीसाठी परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात हजारो उर्दू माध्यमाच्या जि.प. शाळेतील विद्यार्थी असून शिक्षण विभागाला त्यांचा विसर पडला आणि पेपर उर्दू माध्यचे देण्याऐवजी मराठी माध्यमाचा देण्यात आला. यामुळे उर्दू मुलांची इस्रो सहलीसाठी कशी निवड होईल ? असा प्रश्न विद्यार्थी व पालकांमधून विचारला जात आहे. उर्दू माध्यमाची मुले पेपर सोडविता आला गोंधळलेली दिसून आली. उर्दू माध्यमाची मुले पेपर सोडवू शकली नाहीत. तसेच पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या बुद्धि नुसार परीक्षा घेणे अपेक्षित होते मात्र सर्व लहान मोठ्या मुलांसाठी एकच प्रश्न पत्रिका दिल्यायामुळे लहान मुले मागेच राहिले असे दिसून आले आहे. उर्दू माध्यमाच्या मुलांची परीक्षा परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेकडून करण्यात आली.