कृषी

शेतकऱ्यांसाठी म्हत्वाचे ( farmers life ) गोगलगायीचे संकट कसे टाळावे

कृषी कर्मचाऱ्यांचे बांधावर जाऊन गोगलगाय नियंत्रण प्रात्यक्षिक

लोकगर्जनान्यूज

केज : गोगलगाय हे शेतकऱ्यांसमोर ( farmers life ) मागील वर्षांपासून मोठे संकट निर्माण झाले. यावर वेळीच उपाययोजना नाही केल्यातर पिकांचे नुकसान होते. यामुळे आडस ( ता . केज ) येथील कृषि मंडळ अधिकारी कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बांधावर जाऊन गोगलगाय नियंत्रण कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखवले आहे. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित असल्याने याचा त्यांना फायदा होणार आहे.

शेतकरी आयुष्य ( farmers life ) म्हणजे संकट अन् एक नाण्याच्या दोन बाजू म्हटले तर वावगे ठरणार नाही. या संकटांना शेतकरी मुठमाती देऊन जमीन कसत असतो. या संकटात मागील वर्षापासून गोगलगाय हे नवीन संकटाची भर पडली आहे. मागील वर्षी गोगलगायींनी फडच्या फड फस्त केले. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. यावर्षी ही हे संकट येणार असे दिसत आहे. याला वेळीच थोपविण्यासाठी कृषी विभाग सज्ज दिसत असून, ( दि. 8 ) ला आडस येथील कृषी मंडळ अधिकारी पी.एस. वाघमारे, पर्यवेक्षक आर. बी. ठोंबरे, कृषी सहाय्यक श्रीमती बी.व्ही. पतंगे यांनी बांधावर जाऊन बलभीम म्हेत्रे यांच्या शेतात गोगलगाय नियंत्रण मोहीम अंतर्गत गोगलगायीच्या एकात्मिक नियंत्रण बाबत माहिती दिली .यामध्ये शेताच्या बांधापासून आतल्या बाजूने चुन्याचा चार-पाच इंचाच्या पट्टा टाकल्यास गोगलगायीला अटकाव होतो. रासायनिक उपाययोजना करताना मेटालीहाइड २.५ टक्के भुकटी (५०-८० ग्राम/१०० स्क्वेअर फूट) वापरणे, पिकांच्या दोन ओळी किंवा प्रभावीत क्षेत्रात टाकल्यास चांगले नियंत्रण करता येते, तसेच मिथोमिल ४० एस. पी. हे कीटकनाशक वापरल्यास त्याच्या आभिषाने गोगलगायी मृत्यू पावतात. परंतु मेलेल्या गोगलगायी पाळीव प्राणी, भटके प्राणी किंवा पक्षी खाणार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी. गोगलगाय ही कीड निशाचर असल्याने रात्रीच्या वेळेस सक्रिय आक्रमक होऊन पाने खाऊन छिद्र पाडते. सोबतच नवीन रोपे कोंब भाजीपाला वर्गीय पिके फळे फुले तसेच इतर सर्व प्रकारच्या पिकांचे अवशेष यावरही उपजीविका करते. असे याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तर सोयाबीन पिकामध्ये तन नाशकचा वापर, कीड रोग नियंत्रण व फवारणी वेळी विविध कीटकनाशकांचा वापर याबाबत ही माहिती देण्यात आली. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रत्यक्ष करून दाखविण्यात आली. यावेळी बलभीम म्हेत्रे ,निवृत्ती चव्हाण, ज्ञानेश्वर म्हेत्रे , बापू म्हेत्रे ,अविनाश म्हेत्रे ,वैभव म्हेत्रे, व्यंकट म्हेत्रे, अशोक म्हेत्रे, सत्यपाल गायकवाड, रमेश गंगात्रे , गोविंद इंगोले आदि शेतकरी उपस्थित होते.
 दाखवलं प्रात्यक्षिक
एक किलो गूळ दहा लिटर पाणी असे मिश्रण केलं. गोण पाटाची पोते भिजवून ती संध्याकाळच्या वेळी शेतात पिकांच्या ओळीत, बांधावर, झाडाखाली पसरून त्याखाली लपलेल्या गोगलगायी सकाळी गोळा करून उकळत्या पाण्यात अथवा साबणाच्या, मिठाच्या द्रवणात टाकून माराव्यात किंवा खोल खड्ड्यात पुरून वरून चुन्याची बुकटी टाकून खड्डा माती ने झाकून घ्यावा. रबरी हात मोजे घालून शंकी गोगलगायी व त्यांच्या अंडी गोळा करून नष्ट करावीत. हे प्रात्यक्षिक दाखवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »