दोन मित्रांचे अपहरण;केज तालुक्यातील खळबळजनक घटना

लोकगर्जनान्यूज
केज : दोन अल्पवयीन मित्रांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची मुलाच्या वडीलांनी तक्रार केल्यानंतर घटना उघडकीस आली. यामुळे केज तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस तपास करत असून याची मात्र तालुक्यात चर्चा सुरू आहे.
सुमित विकास रोडे रा. मस्साजोग ( ता. केज ), गोविंद आश्रुबा पाळवदे रा. सासुरा ( ता. केज ) असे अपहरण झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे मित्र असून मंगळवारी ( दि. २५ ) ते सोबत होते. त्याच दिवशी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले असल्याची फिर्याद विकास लिंबाजी रोडे यांनी दिली. त्यावरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरणाची घटना उघडकीस येताच तालुक्यात खळबळ उडाली आहे. अपहरण का? केलं असावं अशी चर्चा सुरू झाली आहे. पो.ना. दिलीप गित्ते हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत.