प्रादेशिकराजकारण

व्हायरल न्यूज! सरपंच तुम्हीचं हवेत म्हणून मोर्चा काढून ‘या’गावातील ग्रामस्थांचा अन्न त्याग!

लोकगर्जनान्यूज

निवडणूकीत मतदार आपल्या बाजूने असावीत आणि पिढ्यानपिढ्या आपल्याच घरात पद रहावं म्हणून अनेक गावपातळीवरील पुढारी अनेक आमिष दाखवून व कल्पना राबवून प्रयत्न करतात. आता आम्हाला पद नको , तरुणाला संधी द्यावी म्हणून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला जातो. हा निर्णय ग्रामस्थांना आवडत नाही. ते चक्क मागील सरपंचाच्या घरावर मोर्चा काढून घेराव घालतात. तुमच्याच घरातील आम्हाला सरपंच हवाय म्हणत अन्न,पाणी सोडण्याचा निर्णय घेतात. ही चित्रपटातील स्टोरी नाही तर महाराष्ट्रात घडलेली घटना आहे. आशा प्रकारचा मोर्चा निघण्याची ही पहिलीच वेळ असेल तर हा मोर्चा नेमका कुठे निघाला यासाठी तुम्हाला ही बातमी पुर्ण वाचावी लागेल.

ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की, प्रोग्राम जाहीर झाल्यापासून गावागावात पार्ट्या,दारुचा महापूर येतो. मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक आमिष दाखविले जातात. तर आपल्याच घरात कसे पद राहिलं यासाठी प्रयत्न केले जातात. लोकसभा, विधानसभा लढविणारे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीत पत्नी,मुलगा, पुतण्या, सून,मुलगी यांना उमेदवारी देऊन सर्वच पदांवर आपला दावा ठोकून कार्यकर्त्यांना फक्त आश्वासन देतात. हे चित्र सर्वत्र पहातो. पण या उलटही काही घडतंय,हो घडतंय एका युट्यूब चॅनलची कोल्हापूर येथील बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती दोन दिवसांपुर्वीची असल्याचे त्यावर दिसत आहे. त्या बातमी नुसार म्हाळुंगी ( ता. करवीर ) हा शेती प्रधान गाव आहे. येथील प्रकाश चौघुले हे मागील २० वर्षांपासून व्यवसाय निमित्ताने कोल्हापूर येथे रुईकर कॉलनीत रहातात. परंतु म्हाळुंगी गावच्या ग्रामपंचायतीच्या मागील निवडणुकीत आई पार्वती चौघुले यांना उभे केले. त्या विजयी होऊन गावच्या सरपंच झाल्या. त्यांनी या पाच वर्षांत इतके विकास कामे केली की, गावाचा चेहरामोहरा बदलून गेला. या कामाच्या माध्यमातून त्यांनी गावकऱ्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली. परंतु यावेळी सरपंच पार्वती चौघुले यांच्या घरातून कोणीही निवडणूक लढवणार नाही. तरुणाला संधी द्यायची असा निर्णय झाला. याची माहिती गावात झाली. हा निर्णय ग्रामस्थांना आवडला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी चक्क म्हाळुंगी येथून मोर्चा काढून कोल्हापूरातील प्रकाश चौघुले यांच्या घराला घेराव घातला. यावेळी ‘गावाची काळजी घेणारा कोण प्रकाश दादा शिवाय दुसरा कोण’, येऊन येऊन येणार कोण? प्रकाश दादा शिवाय दुसरा कोण? अशी घोषणाबाजी केली. तुमच्याच घरातील कोणीही उभे रहा पण सरपंच तुम्हीचं हवेत या मागणीवर ग्रामस्थ ठाम आहेत. जोपर्यंत निवडणूक लढविण्याचे जाहीर करणार नाहीत तोपर्यंत आम्ही अन्न-पाणी घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. अशा प्रकारचा मोर्चा निघण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असावी अशी राज्यभर चर्चा सुरू आहे. ही एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाईक मिळत आहेत. अनेकांनी कमेंट करून या सरपंचाचे कौतुक करत प्रत्येक गावाला असा सरपंच मिळावं अशी भावना व्यक्त केली. कामचं बोलतंय, मतदारांना आमिष दाखविण्या पेक्षा विकास कामांची गरज असल्याचे नेटकऱ्यांच म्हणनं आहे. जे पुढारी जनतेला विकास कामांची नाही तर दारु,मटनची गरज असल्याचे व सर्व पदं आपल्याच घरात असावी असा समज आहे. त्यांच्यासाठी ही घटना डोळ्यात अंजन घालणारी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »