क्राईम

बीड जिल्ह्यात खळबळ! नायब तहसीलदारांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

लोकगर्जनान्यूज

केज : येथील नायब तहसीलदार यांना अज्ञात चौघांनी रस्त्यात अडवून भरदिवसा पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यापुर्वीही त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, येथील तहसीलच्या नायब तहसीलदार आशा वाघ या दुपारचे जेवण करून आपल्या दुचाकीवरून तहसील कार्यालयाकडे येत होत्या तेव्हा एक चारचाकी वाहन आडवं आलं. त्यामुळे आशा वाघ यांनी दुचाकी थांबवली असता त्या चारचाकी वाहनातून एक महिला व अन्य पुरुष असे चौघेजण खाली उतरले काही समजण्याच्या आधीच त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने अज्ञात हल्लेखोरांचा प्रयत्न अयशस्वी ठरला असून आशा वाघ यांच्यावर सध्या केजच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »