दोन दशकांचा वनवास संपला ! हारुन इनामदार यांच्या प्रयत्नातून उमरी रस्त्याचे स्वप्न साकार

लोकगर्जनान्यूज
केज : शहरातील म्हत्वाचा व सतत चर्चेत असलेल्या उमरी रस्त्याचे जवळपास दोन दशकांचा वनवास संपणार असून, नगरपंचायतीने मंगळवारी ( दि. २ ) या रस्त्याचे भूमिपूजन केले. केज शहराच्या विकासाचा ध्यास असलेले हारुन इनामदार यांनी या रस्त्यासाठी प्रयत्न करुन निधी उपलब्ध केला. त्यांच्यामुळे या भागातील चांगल्या रस्त्याचे स्वप्न साकार होणार अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
केज शहर आणि समस्या या एका नाण्याच्या दोन बाजू अशी अवस्था आहे. शहरात अनेक समस्या असून यातून शहराची सुटका करण्याची हारुन इनामदार यांची तळमळ पाहून शहरवासीयांना नगरपंचायत निवडणुकीत त्यांना बळ दिले. या जोरावर अनेक वर्षांपासून दुर्लक्षित व सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्याला परिचित उमरी रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर हारुन इनामदार यांच्या प्रयत्नाला यश आले. या उमरी रस्त्याचे मंगळवारी ( दि. २ ) जनविकास आघाडीचे प्रमुख हारुन इनामदार यांच्या हस्ते तर नगराध्यक्षा सौ. सीता बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, मुख्याधिकारी महेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक मुस्तफा खुरेशी, नगरसेवक राजूभाई इनामदार, नगरसेवक भाऊसाहेब गुंड,बाळासाहेब गाढवे,ओम रांजनकर,खेसर इनामदार, नगरसेवक पद्मिन शिंदे,नगरसेवक सुग्रीव कराड,नगरसेवक जलाल इनामदार,शेख सादेक,हाजी बॉस,पत्रकार डी.डी.बनसोडे,
दत्तात्रय हंडीबाग,दशरथ चवरे,मधुकर शिरसट,तात्या रोडे यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. जवळपास मागील दोन दशकांपासूनचे रस्त्याचे स्वप्न साकार होणार असल्याने या भागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.