बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना! ओढ्याला आलेल्या पूरात तीनजण वाहून गेले

लोकगर्जनान्यूज
बीड : आज दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला पूर आला. या पाण्याचा अंदाज न आल्याने घराकडे चाललेले तीन जण पूरात वाहून गेल्याची धक्कादायक घटना शिरुर कासार तालुक्यातील भानकवाडी येथे काही तासांपुर्वी घडली आहे. यातील एका मुलीचा मृतदेह मिळालं असून दोघांचा ग्रामस्थ शोध घेत आहेत.
साईनाथ भोसले ( वय ३० वर्ष ), छकुली कुंडलिक सोनसळे ( वय १० वर्ष ), स्वारा कुंडलिक सोनसळे ( वय ८ वर्ष ) सर्व रा. भानकवाडी ( ता. शिरुर का. ) हे तिघे ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेले. घटना समजताच ग्रामस्थांनी बचावासाठी प्रयत्न केले परंतु पाण्याचा ओघ जास्त असल्यामुळे ते वाहून गेले. ग्रामस्थांनी शोध सुरू केला असून एका मुलीचा मृतदेह बंधाऱ्यात मिळून आलं. दोघांचा शोध सुरू आहे. सदरील ठिकाणी प्रशासनाची काही वेळा पुर्वी पर्यंत मदत पोचली नसल्याचे वृत आहे. आज गुरुवारी ( दि. २० ) दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. दोन मुली व साईनाथ भोसले हे तिघे वस्तीवर असलेल्या घराकडे जातांना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही वाहून गेले असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी सरपंच साईनाथ कैतके व ग्रामस्थ शोध घेत आहेत. याबाबत युवा उत्कर्ष ने वृत्त दिले.