हृदयद्रावक! केज तालुक्यात हिटरने घेतला पती-पत्नीचा बळी

लोकगर्जनान्यूज
केज : आज पहाटे चार वाजता पाणी तापवण्यासाठी हिटर लावताना करंट लागून पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना पिंपळगाव ( घो. ) येथे घडली आहे. या घटनेने केज तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे ( वय ५० वर्ष ) , इंदुबाई ज्ञानेश्वर सुरवसे ( वय ४५ वर्ष ) रा. पिंपळगाव ( घो.) ( ता. केज ) असे मयत पती-पत्नीची नावं आहेत. आज बुधवारी ( दि. २५ ) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास इंदुबाई यांना जाग आल्यानंतर त्या पाणी तापवण्यासाठी हिटर बकेट मध्ये लावताना अचानक करंट लागला. हा प्रकार त्यांचे पती ज्ञानेश्वर यांच्या लक्षात आले. ते वाचविण्यासाठी गेले असता त्यांनाही करंट लागला आणि दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच केज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी विडा येथे सरकारी दवाखान्यात दाखल केले. या घटनेने केज तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.