आपला जिल्हा

चक्क जिल्हाधिकारी कार्यालय समोर केक कापून कुत्र्यांचा वाढदिवस साजरा

बीडमध्ये अनधिकृत बॅनरबाजीच्या विरुद्ध अनोखं आंदोलन

 

बीड : अनधिकृत बॅनरबाजीच्या विरुद्ध व यावर कारवाई न करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ आज सोमवारी ( दि. १६ ) चक्क केक कापून कुत्र्यांचा वाढदिवस तोही जिल्हाधिकारी कार्यालय समोर अनोखं आंदोलन पार पडला असून याची जिल्हा भरात चर्चा सुरू आहे. यामुळे प्रशासनही झोपेतून जागे होऊन चमकोगिरी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारेल का? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शहर, असो की, खेडेगाव चौकात, अथवा मोक्याच्या ठिकाणी चार-दोन तरी होर्डिंग्ज नित्याचेच झाले. काही बहाद्दर तर या वाढदिवसाला लावलेलं होर्डिंग पुढच्या वाढदिसालाच बदलतो. जनसामान्यांत कवडीची किंमत नसणारे ‘आपल्या भाईचा बड्डे’ …. साजरा करणार म्हणत चमकोगिरी करतात. या बॅनर ( होर्डिंगला ) काहीच मर्यादा ( नियम ) नसतात. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी अपघाताला बॅनर कारणीभूत ठरल्याचे वृत आहे. यामुळे शहरांचे विद्रुपीकरण होते. हे वाढते प्रमाण पहाता न्यालयानेही अनाधिकृत बॅनरवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु हे बॅनरबाज म्हणजे पुढाऱ्यांचे बगलबच्चे असल्याने ना गरपंचायत, नगरपालिका कोणीही कारवाई करत नाही. या विरुद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली भाई का बड्डे म्हणत केक कापून कुत्र्यांचा वाढदिवस साजरा करत अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष शेख युनूस, सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड, मोहम्मद मोईज्जोदीन, नितीन सोनावणे, शेख मुबीन, सुशील कांबळे, अविनाश वडमारे, प्रेम कांबळे सह आदी सहभागी झाले. या अनोख्या आंदोलनाची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे. परंतु यामुळे आता बॅनरबाज करणारे व प्रशासन काय बोध घेणार? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »