रब्बी पिकांच्या उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी काय करावे; शेती तज्ञांचे काय आहे मत?

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथे कृषी विभागाच्या वतीने गुरुवारी ( दि. १ ) रब्बी पीक मार्गदर्शन शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी शेती तज्ञांनी रब्बी हंगाम पिकांची काळजी कशी घ्यावी तसेच उत्पादन वाढीसाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांचं काय? म्हणणं आहे यासाठी तुम्हाला ही बातमी पुर्ण वाचावी लागेल.
‘एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमा अंतर्गत गुरुवारी ( दि. १ ) सकाळी आडस ( ता. केज ) येथे रब्बी पीक मार्गदर्शन शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी अनेक तज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभले होते. यावेळी परभणी कृषी विद्यापीठाचे डॉ. वसंत सुर्यवंशी मार्गदर्शन करताना म्हणाले की, शेतकऱ्यांनी विविध रोगांच्या बचावासाठी व उत्पन्न वाढीसाठी पीक आलटून पालटून ( बेवड बदल ) घ्यावं. खरीप हंगामात धुकं येतो यामुळे पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. बुरशी नियंत्रणासाठी बायोमिक्स एकरी ४ किलो वापरावे. फवारणी करताना शेतकऱ्यांनी एकाचवेळी विविध औषधांचा, किटकनाशकांचा वापर टाळावा. किटकनाशकांच्या अधिक वापराने किटकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्याचा धोका असल्याचे म्हटले. तसेच पाण्याचे योग्य नियोजन केल्यास उत्पादनात वाढ होते. तर अंबाजोगाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड मार्गदर्शन करताना म्हणाले की, किड नियंत्रण सार्वजनिक उपाय करणं म्हत्वाचे आहे. यासाठी कामगंध सापळे आवश्यक असून, यामुळे अळ्यांची संख्या वाढत नाही. हरभऱ्यात पक्षी थांबे आवश्यक आहेत. यासाठी पेरणी करतानाच ज्वारी टाकावी. जर ज्वारी टाकली नसेल तर शेतकऱ्यांनी विविध मार्गांनी पक्षी थांबे करावीत जणे करुन हे पक्षी अळ्यांना भक्ष्य करतील. आपले अळी मुळे होणारे नुकसान टळेल. यावेळी सुर्आयकांत वडखेलकर ( कृषी उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई),आडसचे मंडळ कृषी अधिकारी पी.एस. वाघमारे, श्रीमती गोरे एस. बी. ( कृषी सहायक), शेतकरी गजानन देशमुख, शिवरुद्र आकुसकर यांच्यासह आदींची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार श्रीमती भाग्यश्री पतंगे ( कृषी सहायक ) यांनी मानले.