msrtc buses-आडस, अंबाजोगाई मार्गावर धावतात भंगार बसेस
प्रवाशांना इजा झाल्यानंतर धारुर आगारला जागं येणार का?

लोकगर्जनान्यूज
धारुर आगारच्या ( msrtc buses ) पत्रा फाटलेल्या,खिडकी तुटलेल्या बसेस आडस, अंबाजोगाई मार्गावर सोडत असल्याने याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. या भंगार बसेस मुळे प्रवाशांसोबत काही घटना घडल्यानंतर सुस्थितीत असलेल्या बसेस सोडण्यात येतील का असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
धारुर आगारला ( msrtc buses ) सर्वाधिक उत्पन्न देणारा आडस, अंबाजोगाई हा मार्ग आहे. या मार्गावर धारुर आगार शिवाय दुसऱ्या एकाही आगारची बस धावत नाहीत. कोणी एकादी गाडी चालू केली तरी त्या गाडीच्या वेळेलाच धारुर आगाराकडून त्यांची गाडी सोडून ती बंद कशी पडेल याचा प्रयत्न केला जातो. अशा अंबाजोगाई आगाराची नियमित बीडच्या दोन फेऱ्या करणारी गाडी धारुर आगारने बंद पाडली आहे. दुसरी कोणतीही बस येत नसल्याने धारुर आगार ( msrtc buses ) या मक्तेदारीचा पुरेपूर फायदा उचलत भंगार बसेस सोडल्या जातात. त्यांचं वेळापत्रकही नसून दोन-दोन तास बस येत नाही. एकदाच तीन-तीन बस येतात. त्याही कुठे पत्रा फाटलेला, खिडक्या तुटलेल्या, सीट तुटलेलं अशा भंगार बसेस असतात. बुधवारी ( दि. २१ ) आडस येथील राम माने दुपारी ३ वाजता आडस येथून अंबाजोगाई येथे जाण्यासाठी बसमध्ये बसले. यावेळी ते जिथे बसले ती खिडकी निघून पडू नये म्हणून म्हणून पाईप व खिडकी कात्याने बांधलेली होती. तसेच आता पावसाळ्याचे दिवस असूनही वरील पत्रा फाटलेला होता. अनेक सीट कव्हर फाटून व हॅन्ड स्टँड तुटलेली होती. अशी भंगार गाडी होती. याचे फोटो काढून माने यांनी ती सोशल मीडियावर व्हायरल केली आहेत. ही एक बस नाही तर जवळपास अशाच बसेस या मार्गावर सोडण्यात येतात. पुर्ण तिकीट देऊनही सुविधांचा अभाव यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. ( msrtc buses ) च्या भंगार गाड्यांमुळे एखाद्या प्रवाशाला गंभीर इजा झाल्यास धारुर आगाराला जागं येऊन ते सुस्थितीतील बसेस सोडतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चार दोन रु. जास्त घ्या पण प्रवाशांच्या जीवाची काळजी घ्या
शासन व एसटी महामंडळाने ( msrtc buses ) फुकटच्या योजनांचा भडीमार थांबवून आणखी चार-दोन रुपये तिकीट वाढवावं, प्रवाशांना चांगली सुविधा द्यावी. फाटकी,तुटकी बस न सोडता सुस्थितीत असलेल्या बसेस सोडून प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची काळजी घ्यावी. कारण माणसाच आयुष्य अमूल्य असून तो गेला तर परत येणार नाही. अशी प्रतिक्रिया प्रवासी राम माने यांनी दिली.