
लोकगर्जनान्यूज
बीड : यापुर्वीच आरोग्य विभागात भरती करण्यात येणार होती परंतु ती थांबली होती. राज्य शासनाने या जागा भरतीचा निर्णय घेतला असल्याचे एका पत्रकार परिषदेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केली. तसेच भरतीप्रक्रिया कोणत्या तारखे पासून राबवली जाणार हे वेळा पत्रकही सांगितले. यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ ( लॅब टेक्निशियन ) आणि आरोग्यसेवक यांची भरती होणार आहे.
यासाठी १३ हजार पदांच्या भरती २०१८ मध्ये घोषित करण्यात आली होती. यावेळी लाखो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून परिक्षा शुल्क भरला होता. परंतु कोरोनासह आदी काही अडचणींमुळे ही भरती होऊ शकली नाही. तेंव्हा पासून तरुणांचे या भरतीच्या घोषणा कधी होणार याकडे लक्ष लागले होते. अखेर तो दिवस आज. उजाडला, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारने मोठा निर्णय घेतला असल्याचे सांगून आरोग्य विभागाच्या १० हजार १२७ जागा भरणार असल्याचे सांगितले. या जागांसाठी भरतीप्रक्रिया १ ते ७ जानेवारी दरम्यान जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, यानंतर अर्ज मागवून घेण्यात येतील. या अर्जांची छाननी २५ ते ३० जानेवारी दरम्यान होईल, ३१ जानेवारी किंवा २ फेब्रुवारीला वैध अर्जांची यादी जाहीर होईल, २५ ,२६ मार्चला परिक्षा घेऊन २७ एप्रिल पर्यंत निकाल घोषित करुन पास झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येतील असे वेळापत्रक सांगितले आहे. यामुळे शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही आनंदाची व दिलासा दायक बातमी आहे.
जागा झाल्या कमी
२०१८ मध्ये जेव्हा या जागांसाठी भरती निघाली होती तेव्हा १३ हजार जागा होत्या. यासाठी तब्बल साडेअकरा लाख उमेदवारांनी अर्ज भरले होते. आता १० हजार १२७ जागांसाठी भरती होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे २ हजार ८७३ जागा कमी झालेल्या आहेत. याबाबत लोकसत्ताने वृत्त दिले आहे.