शिक्षण संस्कृती
अशोक दिवटे यांना पुरस्कार

पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील डाकबंगला वस्तीशाळेतील शिक्षक अशोक कचरु दिवटे यांना नाथापूर केंद्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
शिक्षक अशोक दिवटे यांनी गत अनेक वर्षापासून अतिशय बिकट परिस्थितीत वस्तीवरचे गरीब व शेतकऱ्यांच्या मुलांसाठी भरीव असे कार्य केले आहे. वेतन कमी मिळत होते तरी त्यांनी शिक्षण दानाचे कार्य सतत चालूच ठेवले त्यांच्या या कार्याची दखल शिक्षण प्रशासनाने घेऊन त्यांना नुकताच यावर्षीचा केंद्रस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर केला आहे. या यशाबद्दल त्यांचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी क्षीरसागर, केंद्र प्रमुख गिते, सारडा, कानाडे, चंद्रकांत आरसुळ, माने, नामदेव फुलझळके, शिंदे सह शिक्षकांनी अभिनंदन केले.