कृषी

सोयाबीन उत्पादकांसाठी म्हत्वाचे: स्टॉक लिमिट काढल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार?

लोकगर्जनान्यूज

बीड : नवीन सोयाबीनची बाजारात आवक वाढली असल्याने दरांचे चढउतार आहेत. आनंदाचे वृत्त असून केंद्राने सोयाबीनचे स्टॉक लिमिट काढलं आहे. यामुळे व्यापारी बाजारात उतरण्याची शक्यता असून यामुळे सोयाबीनला चांगले दर मिळणार? असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यासोबतच तेल आयात वाढू शकते हा धोका आहे. यामुळे बाजारावर लक्ष ठेवून शेतकऱ्यांनी टप्याटप्याने सोयाबीन शिकावं असे जानकार मत व्यक्त करत आहेत.

मागील वर्षी सोयाबीन ११ हजार या ऐतिहासिक उंचीवर दर गेले होते. असेच दर रहातील म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन पीकाला पसंती देत पेरा केला. परंतु नंतर ७ हजारांवर दर आले. यानंतर घसरण होत ५ हजारांच्या आत आले. दर वाढण्या मागे सोयापेंड, तेल दरवाढ हे प्रमुख कारण सांगितले जात होते. तेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने तेल आयात वाढावी म्हणून आयात शुल्क कमी केले. सोयापेंड आयात केली. वायदे बाजारातून सोयाबीन वगळले तसेच यावर स्टॉक लिमिट लावलं याचा परिणाम सोयाबीन दरांवर झालं. ११ हजारांवरील सोयाबीन ५ हजारांच्या आत आले. दर वाढतील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन साठा करुन घरात ठेवेल आहे. आजही अनेक शेतकऱ्यांच्या घरात गतवर्षीचे सोयाबीन आहे. परतीचे पाऊस थांबून १०-१२ दिवस झाले असून चांगली उघडीप असल्याने शेतकऱ्यांनी खळे केले असल्याने बाजारात काही अंशी सोयाबीनची आवक वाढली आहे. यामुळे अनेक ठिकाणी बाजारात ४ हजार ८०० ते ५ हजार असे सोयाबीन दर होते. मात्र मागील दोन दिवसांपासून यात काहीशी सुधारणा झाली आहे. सध्या ५ हजार १०० ते ५ हजार ४०० असे गुरुवारी ( दि. ३ ) चे दर दिसून आले. दर वाढण्या मागे स्टॉक लिमिट काढल्याचे कारण सांगितले जात आहे. यामुळे व्यापारी आता जास्त प्रमाणात बाजारात उतरतील आणि मागणी वाढून याचा शेतकऱ्यांना फायदा होईल असा अंदाज आहे. तरीही सोयाबीनचे दर ५ ते ६ हजार असे रहातील तसेच खाद्य तेलाची आवक वाढण्याचा धोका आहे.‌ त्यामुळे नेमके दर कसे रहातील हे आताच सांगणे घाईचे ठरेल त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन दर बाबतीत जागरूक राहून व बाजारावर लक्ष ठेवून सोयाबीन टप्याटप्याने विकणे सोयीचे ठरेल असे मत अभ्यासक व्यक्त करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर सुधारत असल्याचे वृत्त असून याचाही परिणाम दिसून येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »