UPSC – निकाल घोषित: मुलींची बाजी देशात अन् महाराष्ट्रात मुलगीच प्रथम
लोकगर्जनान्यूज
मुंबई : UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा २०२२ निकाल घोषित झाला. या निकालात मुलींनी बाजी मारली असून देशात पहिल्या तीनही मुलीचं आहेत तर महाराष्ट्र राज्यातूनही मुलीनेच प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC ) नागरी सेवा २०२२ परीक्षा दिलेल्या मुलांच्या मुलाखती आयोगाने ( दि. २४ ) एप्रिल ते ( दि. १८ ) मे या कालावधीत घेतल्या. याचे निकाल आज घोषित करण्यात आले. याही परीक्षेत मुलीचं टॉपर दिसत असून देशातून रँक १ घेत इशिता किशोर प्रथम आली आहे. रँक २ गरिमा लोहिया तर तृतीय उमा हराथी ही आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर ठाणे येथील कश्मिरा संखे हीने रँक २५ घेऊन राज्यातून प्रथम आली. या पाठोपाठ रिचा कुलकर्णी ( ५४ रँक ), जान्हवी साठे ( रँक १२७ ), सुरभी पाठक ( रँक १५६ ), ऋषिकेश शिंदे ( रँक १८३ ), वगिशा जोशी ( रँक १९९ ) , अर्पिता ठुबे ( रँक २१४ ), दिव्या अर्जुन गुंडे ( रँक २६५ ), किर्ती जोशी ( रँक २७४ ) , अमर राऊत ( रँक २७७ ), अभिषेक दुधाळ ( रँक २७८ ) या व्यतिरिक्त ही अनेक मराठी मुला-मुलींनी UPSC परीक्षा सर केली आहे. हे निकाल पहाण्यासाठी upsc.gov.in येथे लॉगीन करुन निकाल पहाता येईल.