भवताली

UPI Payment – ऑनलाईन पेमेंटची सवय आता खिशाला न परवडणारी

या तारखेपासून लागणार कर; डिजिटल इंडिया आता मागे पडणार का?

लोकगर्जनान्यूज

डिजिटल पेमेंट करण्याची लोकांना आता बऱ्यापैकी सवय झाली. खिशात पैसा घेऊन फिरण्यापेक्षा हे बरं म्हणून लोक अनेक वस्तू, हॉटेल सह आदींचे बील मोबाईल वरुन करत आहेत. परंतु हे सवय आता खिशाला न परवडणारी ठरण्याची शक्यता आहे. येत्या १ एप्रिल पासून UPI Payment वर आता Charge लागणार असल्याचे वृत्त आहे.

मोदी सरकारने नोट बंदी केली. यानंतर मोठा गाजावाजा करत डिजिटल इंडियाचा नारा देत UPI Payment डिजिटल पेमेंट आणलं. हे मोबाईल व्दारे भीम ॲप,. फोन पे, गुगल पे, पे टीएम असे ॲप आले. आतातर व्हाट्सअप आणि अमेझॉननेही ही सुविधा सुरू केली. तसेच सुरवातीला डिजिटल पेमेंटला प्रतिसाद मिळावा, सामान्य माणूस याकडे वळवा म्हणून शासनाने जास्तीत जास्त ऑनलाईन पेमेंट करेल त्यास कोटीवर बक्षीस ठेवली होती. आता काहीसा सामान्य माणूस डिजिटल पेमेंट कडे वळला असून, आता किराणा दुकान, हॉटेल, टपरीच काय तर अनेक वस्तू खरेदी केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करत आहे. पैसा खिशात घेऊन फिरण्यापेक्षा हे बरं म्हणून आता ( Phone pay, Google pay, Paytm ) सह आदि ॲपचा वापर करत ट्रांजेक्शन करत आहे. इंग्रजांच्या खेळी प्रमाणे जनतेला सवय लागल्याची जाणीव होताच. चार्ज ( Charge ) लावण्यात येत आहेत. येत्या 1 एप्रिल पासून 2000 ( दोन हजार ) पेक्षा जास्त असलेल्या प्रत्येक ( UPI transition ) 1.1 टक्का चार्ज ( Charge ) लागणार आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी व पेमेंट करणाऱ्यांना हे सवय बदलावी लागणार आहे. अन्यथा खिशाला कात्री लागलीच समजा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »