आपला जिल्हाक्राईम

अंबाजोगाई जवळ भीषण अपघात;चार जण ठार

कंटेनर-कारची धडक; लातूर रोडवरील घटना

लोकगर्जनान्यूज

अंबाजोगाई : रात्रीच्या मुसळधार पावसात कंटेनर आणि कारची धडक होऊन भीषण अपघात घडला. यात कार मधील चार जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना आज रविवारी पहाटे अंबाजोगाई-लातूर महामार्गावर नांदगाव पाटीजवळ घडला आहे.

वाढते रस्ते अपघात चिंतेचा विषय ठरले असून, यासाठी केवळ अरूंद रस्ते कारणीभूत असल्याचे दिसत आहे. आज रविवार पहाटेच्या १ वाजता औरंगाबादकडे जात असलेल्या कार एम.एच. २४ एस एस ६३३४ आणि कंटेनर क्र. एम.एज. १२ एम व्ही ७१८८ ची नांदगाव पाटी पाचपीर दर्गाजवळ मुसळधार पावसात कंटेनर न दिसल्याने कार सरळ कंटेनर खाली गेली. यामध्ये कार मधील चार प्रवासी जागीच ठार झाले. मयतांची नावे अद्याप समजली नसून ते चाकुर तालुक्यातील जगलपूर ( जिल्हा लातूर) येथील असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पहाटेच मृतदेह स्वाराती रुग्णालयात दाखल केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »